व्हिडियो पाहून सुटले तोंडाला पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:21 IST
सगळीकडे तीन पदार्थांपासून तयार होणाऱ्या डिलिशिअस चीजकेकच्या रेसिपीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हिडियो पाहून सुटले तोंडाला पाणी!
इंटरनेटवर कोणती गोष्टी व्हायरल होईल आणि सगळीकडे तिची चर्चा सुरू होईल याचा काही नेम नाही. मग तो ‘चार्ली बीट मी’ हा व्हिडियो असो वा रजनीकांत, आलिया भट, संस्कारी बाबूजीचे जोक असो, नेटकरांना कशाचेही वेड लागू शकते. सध्या सगळीकडे तीन पदार्थांपासून तयार होणाऱ्या डिलिशिअस चीजकेकच्या रेसिपीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.सौफल चीजकेक असे या केकचे नाव आहे. त्याला जपानी कॉटन चीजकेक असेही म्हणतात. केवळ अंडी, डार्क (किंवा व्हाईट) चॉकलेट आणि क्रिम चीज या तीन पदार्थांपासून तयार होणारा हा आकर्षक केक जणू काही एखाद्या फाईव्ह स्टार बेकरीमध्ये तयार करण्यात आला आहे असा दिसतो. बनविण्याची सोपी आणि साधी पद्धतीमुळे तो सर्वत्र गाजत आहे. ओचिकेरॉन या यू-ट्युब चॅनेलने तो २०१३ साली हा रेसिपी व्हिडियो अपलोड केला होता. मात्र, अलिकडच्या काळात तो व्हायरल झाला आहे.आतापर्यंत त्याला यू-ट्युबवर ६६ लाख व्यूवज् मिळाले आहेत. साधारणत: सर्वांच्या घरात उपलब्ध असणाऱ्या तीन इनग्रेडिएन्ट्सपासून बनणारा हा केक सर्वांच्याच तोंडाला पाणी आणत आहे, असे म्हणावे लागेल.तुम्ही स्वत:ही पाहा आणि सांगा काय वाटतं?