ऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:19 PM2020-01-23T16:19:48+5:302020-01-23T16:22:53+5:30

सध्याच्या काळात ऑफिस अफेअर ही गोष्ट अगदी कॉमन झाली आहे.

know these rule related to Office Affairs and job profile | ऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का?

ऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का?

Next

सध्याच्या काळात ऑफिस अफेअर ही गोष्ट अगदी कॉमन झाली आहे.  असे खूप कमी कपल्स असतात जे ऑफिसमध्ये असताना आपल्या नात्यामध्ये प्रोफेशनॅलिजम मेंटेन करत असतात.  म्हणूनच काही लोक आपली कंपनी किंवा टीम स्विच करणं पसंत करत असतात. पण प्रत्येक कपल्सच्या बाबतीत वेगवेगळ्या स्थिती असू शकतात. तुमचं सुद्धा ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीशी बोडींग असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला लाईफ पार्टनर बनवण्याच्या विचारात असाल किंवा आधीपासूनच ऑफिसमधल्या एखादया व्यक्तीसोबत अफेअर असेल तर आज आम्ही तुम्हाला ऑफिस अफेअरशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत नियम.

Image result for office affairs(Image credit- intheceblack) 

ऑफिस अफेयर्सशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत निर्मला सितारामन यांनी सांगितले की जवळपास  १२ ते १५ वर्षापूर्वी काही कंपन्यांनी  आपल्या  कपल्स असलेल्या एम्प्लोईजना डेटिंग अलाऊंस द्यायला सरूवात केली होती. ऑफिसचे वातावरण चांगले आणि अनुकूल राहावे अशी त्या मागची संकल्पना होती. पण ही गोष्ट ऑफिसच्या दृष्टीने चुकिची ठरली. हा निर्णय फारसा परिणामकारक ठरला नाही.

Related image

२०१९ मध्ये  मॅकडोनाल्डट चे सीईओ  स्टीव ईस्टरब्रूक यांना आपल्या सहकारी असलेल्या एका सोबत रिलेशन ठेवले होते. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. कारण त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीत ऑफिस अफेअर्सशी निगडीत कोणतीही तरतूद नव्हती. यासाठी आपण ऑफिल अफेअरचे नियम जाणून घेणं महत्वाचं आहे. ऑफिस अफेअर्सना नकार देण्यामागे कंपन्यांचा एक दृष्टीकोन होता. जर सिनीयर आणि ज्यूनिअर यांचामध्ये एका प्रकारचं इमोशनल  बॉन्डींग असेल तर काहीवेळा व्यक्ती अनप्रोफेशनल  निर्णय आणि फेवरिजम  करण्याची शक्यता असते. याचा परिणाम संपूर्ण ऑफिसवर होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स)

Image result for office affairs(image credit- so posted.com)

भारतातल्या आणि इतर अनेक देशांमध्ये ऑफिस अफेअर्सना विरोध असण्यामागे सिनीअरर्स आणि ज्यूनिअर्सचं इमोनल बॉडिंग होऊ नये हे  कारण असतं. काही कंपन्यामध्ये जर तुमचे तुमच्या ज्यूनिअरसोबत अफेअर असेल तर  एचआरला इन्फॉम कराव लागतं. ज्या कंपन्यांमध्ये ऑफिस अफेअर्सना बंदी असते त्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांच जर अफेअर असेल त्यांना हे कळायला हवं कि ते आपल्या कंपनीच्या विरोधात जाऊन अफेअर करत आहेत. काही कंपन्यांना असा रूल असतो की  रिलेशनशीपमध्ये असलेल्या कपल्सना ते आपल्या टिममध्ये ठेवत नाहीत. ऑफिस कल्चर आणि प्रोटक्टीव्हीटी कमी होऊ नये असं त्यांना वाटत असतं. ( हे पण वाचा-तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?)

Web Title: know these rule related to Office Affairs and job profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.