तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:19 PM2020-01-22T14:19:39+5:302020-01-22T14:35:44+5:30

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर पार्टनरसोबत राहून अनेक अनुभव येत असतात.  

How will you know if your boyfriend still connected with ex girlfriend | तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?

तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?

googlenewsNext

(image credit- indiamart)

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर पार्टनरसोबत राहून अनेक अनुभव येत असतात.  तसचं तुम्ही रिलेशनमध्ये आल्यानंतर आपला पार्टनर कसा आहे. त्याची एक्स कशी होती. या गोष्टी समजायला सुरूवात होते. कोणत्याही मुलासोबत अथवा मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर  सुरूवातीला खूप चांगलं वाटत असतं. पण नंतर पार्टनर बद्दल एक एक गोष्टी कळायला लागतात. मग काहीवेळा आपण या व्यक्तीसोबत कमिटमेंट का केली असं सुद्धा वाटायला लागतं.  प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं कि त्यांच्या पार्टनरने त्याना लहानमोठ्या  सगळ्या गोष्टी सांगायाला हव्यात. 

Image result for couples(image credit- goalcast)

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर मुलींना किंवा मुलींना आपल्या पार्टनरच्या आधीच्या लाईफबद्दल खूप  नवीन गोष्टी माहीत पडत असतात.  पण काही व्यक्ती असे असतात  कि ते आपल्या पार्टनर पासून अनेक गोष्टी लपवून ठेवत असतात. काही मुलं किंवा मुली नवीन रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्या एक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तसचं एक्सला मिस करत असतात. पण हे करत असताना ते आपल्या पार्टनरला कळू सुद्धा देत नाहीत. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होण्याची शक्यता आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला जर तुमचा पार्टनर आत्तासुद्धा एक्सच्या संपर्कात असेल हे कसं ओळखायचं हे सांगणार आहोत. 

पार्टनरशी बोला

Image result for couples talking
(image credit- consious rethink) 

एक चांगलं नातं तयार करण्यासाठी पार्टनरशी  बोलणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही खूलेपणाने आपल्या पार्टनरशी बोलण्याचा  प्रयत्न करा. जर तुम्ही पार्टनरशी जेवढ्यास तेवढचं बोलत असाल तुमचं नातं जास्त काळ टिकणार नाही. पार्टनरच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर पार्टनरशी मनमोकळेपणाने बोलायलाच हवं. जर तुम्ही पार्टनरशी शेअरिंग केलं तर त्याच्या मनातल्या भावना तुम्हाला समजण्यास मदत होईल.

कारण

Image result for couples talking(www.intertales.com)

रिलेशनशीपमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे कारण.  पार्टनर जर आधी इतर मुलींसोबत रिलेशनशीपमध्ये असेल तर त्यांचं नातं का तुटलं हे जाणून घ्या. कारण जर तुम्हाला पार्टनरने एक्सपासून वेगळं होण्याचं कारण सांगितलं तर तुम्हाला त्याच्या नात्याबद्दल कळायला मदत होईल. तसचं  पार्टनरने स्वतःहून एक्स पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे की  जबरदस्ती त्याला हे पाऊस उचलायला लागलं आहे हे माहित असणं महत्वाचं असतं.  कारण जर तुमचा पार्टनर एक्सपासून लांब गेल्यामुळे मानसिक रित्या दुखावला गेला असेल तर तो एक्ससोबत संपर्क करण्याची शक्यता असते. 

वेळ घ्या

Image result for conversation couples talking

(image credit- wellnessnmind)

जर तुम्हाला हे कळलं असेल कि तुमचा पार्टनर एक्सच्या संपर्कात आहे. तर लगेच त्याच्यावर किंवा तिच्यावर रागवण्याचा प्रयत्न करू नका. कारण  यामुळे तुम्हाला समजायला मदत होईल की तुमचा पार्टनर एक्ससोबत मैत्रीच्या नात्याने संपर्कात आहे की त्यांच्यात अजून काही नातं आहे.  हवं तर तुम्ही नंतर हायपर रिएक्ट न होता तुम्हाला ही गोष्ट आवडत नाही.  हे पार्टनरला सांगू शकता. ( हे पण वाचा-लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स)

ब्रेकअप 

Image result for brekup

अनेकदा  पार्टनरच्या ब्रेकअपचे कारण न समजल्यामुळे गैरसमज होत असतात. पार्टनरचे ब्रेकअप का झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं सुद्धा असू शकतं की पार्टनर या निर्णयाला जबरदस्ती तयार झाला असेल किंवा असं सुद्धा असू शकतं.की पार्टनर स्वतःहून एक्स पासून लांब गेला असेल.  नक्की कारण काय आहे.  ते जाणून घेऊन मग रिएक्ट करा.  ( हे पण वाचा-बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! )

Web Title: How will you know if your boyfriend still connected with ex girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.