तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 06:26 PM2019-12-29T18:26:06+5:302019-12-29T18:30:54+5:30

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं.

know the reasons of breakup happens. | तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

googlenewsNext

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं. सतत पार्टनरची आठवण येणं, बोलावसं वाटणं तसंच भेटण्याची ओढ असणं हे  सगळ्यांचाच बाबतीत होत असतं  कारण सुरूवातीला आपल्याला एखाद्या व्य्क्तीबद्दल, त्याच्या सवयींबद्दल पूर्णपणे माहीत नसतं. पण कालांतराने ह्या भावना कमी होऊ  लागतात. पार्टनरचा कधी कधी कंटाळा सुद्धा  येत असतो. कालांतराने या सगळ्याचा परीणाम नात्यावर होऊन ब्रेकअप होतं. जाणून घ्या कंटाळा का येतो आणि नातं तु़टण्यास कोणती परीस्थीती कारणीभूत ठरते.

मनाच्या सुंदरतेकडे लक्ष देणे  हे नाते तुटण्याचं कारण ठरत असतं. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात असता तेव्हा फिजिकल एट्रॅक्शन  खूप असतं. अनेकदा व्यक्तीच्या चेहरा कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीसोबत राहायचं की नाही हे ठरत असतं कारणं सध्याच्या काळाच मनाच्या चांगल्या असण्यापेक्षा चेहरा चांगला असलेली व्यक्ती  पार्टनर म्हणून हवी असते. त्यामुळे इतर सुंदर व्यक्तींच्या रुपामुळे जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक असू शकतं.

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. नात्यात जर तोचतोचपणा येत असेल काही नवीन घडत नसेल तर ते नातं कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणून काहीवेळा जोडीदार असताना सुद्धा मन भटकायला लागतं. 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल किंवा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला नातं टिकवण्यात काही रस राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच पार्टनर पासून लपवायला नकोत अशा गोष्टी सुद्धा लपवल्या जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि नातं तुटू शकतं. 
 

Web Title: know the reasons of breakup happens.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.