शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 11:14 IST

डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

(Image Credit : www.magicdesktop.com)

डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यातील एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. या उदहरणावरुन लहान मुलांच्या जीवनात डिजिटल प्रॉडक्टचा कसा प्रभाव वाढतोय हे दिसतं.

अमेरिकेतील टेक्सास इथे राहणारी ८व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तिच्या आईकडे काही गिफ्ट मागितले. पण आईने नकार देऊ नये म्हणून मेकनाह गॅटिका नावाच्या या मुलीने चक्क PPP पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करुन आईकडे डिमांड केली. मेकनाह ही साउथ कोरियन बॉय बॅन्ड बीटीएसची फार मोठी फॅन आहे. त्यामुळे ख्रिसमस गिफ्टची लांबलचक यादी करताना तिने बीटीएसचे रेकॉर्ड अलबम, प्यूमा स्नीकर्स, बीटीएसचे पोस्टर्स आणि स्लिपर्सची मागणी केली. तिला हे माहीत होतं की, आईला या वस्तू सरळ सरळ मागितल्या तर ती देणार नाही. त्यामुळे १३ वर्षाच्या या मुलीने ८५ स्लाइडची एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं.  

डिजिटल पद्धतीने नात्यांची घडी

या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीच्या काही स्लाइडमध्ये मेकनाहने साउथ कोरियन पॉप म्युझिक सेंसेशनचे काही फोटो लावले होते. ते किती लोकप्रिय आहेत, हे दाखवण्यासाठी तिने हे फोटो लावले होते. त्यात त्यांचे काही व्हिडीओ सुद्धा तिने एम्बेड केले होते. त्यानंतर हळूहळू एकानंतर एक स्लाइडमध्ये मेकनाहने आपल्या मागण्यांबाबत सांगितले. हेही सांगितलं की, तिच्यासाठी या वस्तू किती महत्त्वाच्या आहेत. यावरुन हे समोर येतं की, आत्ताची पिढी ही डिजिटल विश्वात जगात आहे. त्यामुळे ते नातीही डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून मेंटेन करत आहेत. मेकनाह हे एकच उदाहरण नाही तर अशी अनेक लहान मुले अशाप्रकारचं प्रेझेंटेशन तयार करुन आपल्या मागण्या पूर्ण करुन घेत आहेत. 

शाळेतील प्रोजेक्टसाठीही पीपीपीचा वापर

शाळेतील प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त मुलांना स्लाइड शो तयार करण्यासाठी सांगितलं जातं. त्यामुळे लहान मुलं टेक्नॉलॉजीसोबत चांगल्याप्रकारे जुळले जात आहेत. तसेच त्यांना यात सहजता वाटते आहे. मुलांना अशाप्रकारे पाहून पालकांनाही आनंद होतो आणि कोणतीही तक्रार न करता मुलांच्या मागण्या पूर्ण करतात. 

लहान मुलांबाबत सांगायचं तर पॉलिश्ड प्रेझेंटेशनमुळे त्यांचे अनेक उद्देश सफल होतात. पहिला हा की, लहान मुलं स्लाइड शो च्या माध्यमातून पालकांना सहजपणे समजावून सांगू शकतात की, ते जे मागत आहेत ते त्यांच्यासाठी किती गरजेचं आहे. तसेच ते त्यांच्या मागण्यांच्या समर्थनात तसं वातावरण तयार करु शकतात. जेणेकरुन पालक मुलांच्या मागण्यांना नाही म्हणू शकत नाहीत. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन