शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ब्रेकअपनंतर पुन्हा पॅचअप करायचं असेल तर वापरा 'हा' फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 2:48 PM

अनेकदा आपली आणि आपल्या पार्टनरची भांडण होतात.

अनेकदा आपली आणि आपल्या पार्टनरची भांडणं होतात. त्यामुळे तो काळ आपल्यासाठी खूप वाईट असतो. काहीजण रागाच्या भरात आपल्या पार्टनरला उलटसुलट बोलतात. त्यामुळे नातं तुटतं. मग राग शांत झाल्यानंतर असं वाटायला लागतं की आपण असं का केलं. आपल्याला पुन्हा आपल्या पार्टनरसोबत पॅचअप करावसं वाटत असतं. कारण तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लांब राहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला  ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा पॅचअप कसं करायचे हे सांगणार आहोत.

ब्रेकअपनंतर लगेच इतर मुलींना डेट करू नका

ब्रेकअप केल्यानंतर काही मुलं भावनाशून्य असल्यासारखे वागत असतात. किंवा इतर मुलींशी जास्त बोलणे आपल्या एक्सच्या समोर इतर मुलींसोबत बोलणे. त्यामुळे तुमच्या एक्सच्या मनात तुमच्याबद्दल असंवेदनशीलता येण्याची शक्यता असते. तसंच तुमच्यासोबत पुन्हा पॅचअप करण्याचे होप्स सुद्धा संपलेले असतात. 

नकरात्मक गोष्टींपासून लांब रहा

(image credit-black magic)

अनेकदा मुलं ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या गर्लफ्रेन्डच्या जुन्या गोष्टी आठवत असतात. ज्यामुळे तुम्हाला मानसीक ताण येत असतो. त्यामुळे मुलं निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतात.  पण जर तुम्हाला त्याच व्यक्तीसोबत पुन्हा पॅचअप करायचं असेल तर नकारात्मक गोष्टींपासून लांब रहा. ज्यामुळे तुम्ही खूप रिलॅक्स फील कराल.

सोशल मीडियावर जगजाहीर करू नका

ब्रेकअपनंतर आपल्या बॉयफ्रेडद्दल किंव गर्लफ्रेन्डबद्दल सोशल मीडीयाचा वापर करून सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही. कारण जर तुम्ही सोशल मिडीयाचा आधार घेऊन जर पार्टनरविषयीच्या भावना व्यक्त करत असाल तर तुम्हाला दुःख होण्याची शक्यता असते. 

ब्रेकअपची कारणं समजून घ्या

मुलं किंवा मुली रागाच्या भरात आणि काहीही विचार न करता निर्णय घेत असतात. जर तुम्ही सुद्धा घाईघाईत ब्रेकअपचा निर्णय घेतला असेल तर त्यामागचे कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करा.  कराण जर शुल्लक कारणावरून तुम्ही ब्रेकअप केलं असेल तर तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-पार्टनरसोबत डेटला जायचयं पण बजेट कमी? 'या' टीप्स वापराल स्वस्तात मस्त होईल डेट)

कारण ब्रेकअप झाल्यांनंतर अनेक व्यक्ती मानसीकदृष्ट्या थकल्यासारखे वागत असतात. आयुष्य उधवस्त झाल्यसारखं सुद्धा वाटू शकतं. काहीजण नशेच्या आहारी जात असतात. त्यासाठी ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला वेळ द्या. तुम्ही या गोष्टीचा वापर करून स्वतःच्या पार्टनरचा राग दूर करून पुन्हा पॅचअप करू शकता. ( हे पण वाचा-पतीची 10 प्रेमप्रकरणं समजली; तरीही खूश आहे ही महिला...कसे काय?)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप