(image credit- the art of charm)

सध्याच्या काळात डेटिंगचा क्रेझ तरूणाईमध्ये  सगळ्यात जास्त जाणवतो.  सोशल मिडीया वर भेट झाल्यानंतर  प्रत्येकालाच आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत डेटला जायचं असतं. पण मुलांचा पॉकेटमनी नेहमीच जास्त असेल असं नाही. प्रत्येकवेळी खर्च करूनच डेटला जायला हवं असं नाही.  आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही कमी खर्चात सुद्धा आपल्या पार्टनरला डेटवर घेऊन जाऊन तुमचा आनंद  साजरा करू शकता. 

Image result for dating(Image credit -ps love you)

डेटिंग करण्यासाठी स्वस्त मार्गाचा वापर करू शकता. आपल्या डेटींग पार्टनरला हा निर्णय का घेतला हे कळू देऊ नका. तुम्हाला या पध्दतींची आवड आहे असं सांगा. ( हे पण वाचा-म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....)

Image result for dating(image credit- femina.in)

डेटिंग वर जाताना जास्त आकर्षक मेकओवर किंवा महागडे कपडे घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या पार्टनरला असं सांगा की तुम्हाला साधं राहणीमान आवडतं. मॉल किंवा हॉटेलमध्ये खर्च करायला आवडत नाही असं तुम्ही सांगू शकता. ( हे पण वाचा-ऑफिस अफेअरशी निगडीत कंपन्यांचे 'हे' नियम माहीत आहेत का?)

Image result for dating
 (image credit-askman)

जर तुम्हला तुमची डेट निसर्ग सानिध्यात करायची असेल तर तुम्ही बोटींग किंवा स्केटिंग अशवा फिशिंग करू शकता.

Image result for dating(image credit- women partner)

 डेटवर जात असताना आपल्या खिशाकडे आणि पाकीटाकडे लक्ष देण्यापेक्षा डोक्याचा वापर करा. असा विचार करा की ज्यामुळे कमी खर्चात तुम्हाला जास्त इन्जॉय करता येईल. त्यामुळे मुलीसमोर  इंप्रेशन सुद्धा चागलं राहील. लॉंंग डाईव्ह पेक्षा लॉंंग वॉकला जायला काही हरकत नाही. कारण रस्त्यात तुम्ही पाणी पूरी किंवा भेळपुरी असं स्ट्रिट फूड खाऊन पार्टनरला चांगली कंपनी देऊ शकता.

Related image(image credit-busstle)

कोणत्याही स्वस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही  कॉफी किंवा चहा घेण्याचा आनंद घेऊ शकता. घरीसुद्धा मित्रांना बोलावून तुम्ही गेट दू गेदर करू शकता. ज्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्या जवळ येण्याची संधी मिळेल. डेटिंग करत असताना तु्म्ही पार्टनरला विंडो श़ॉपिगं करायला घेऊन जाऊ शकता.  

Image result for dating(image credit datingnews.com)

घरीसुद्धा पार्टनरला बोलावून कॅन्डल लाईट डिनर करू शकता. जर तुमच्या पार्टनरला व्हिडीओ  गेम किंवा स्विमिंग अथवा बॅटमिंटन खेळायला आवडत असेल तर तुम्ही  असे गेम्स खेळून आनंदाने वेळ घालवू शकता. 

Web Title: How to enjoy with dating partner in minimum budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.