मनात 'हे' विचार येत असतील तर रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा फायद्याचं ठरेल ब्रेकअप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:43 IST2019-07-05T13:37:00+5:302019-07-05T13:43:05+5:30
कोणतंही नातं एकदम तोडणं कुणासाठीही सोपं नसतं. जर तुमचं रिलेशनशिप रोमॅंटिक असेल तर जोडीदारापासून दुरावा ठेवणे अधिकच कठीण असतं.

मनात 'हे' विचार येत असतील तर रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा फायद्याचं ठरेल ब्रेकअप!
(Image Credit : Miss Kyra)
कोणतंही नातं एकदम तोडणं कुणासाठीही सोपं नसतं. जर तुमचं रिलेशनशिप रोमॅंटिक असेल तर जोडीदारापासून दुरावा ठेवणे अधिकच कठीण असतं. आपण कोणतंही नातं हे एका क्षणात संपवू शकत नाही. रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप करण्याआधी आपण मनात अनेक प्रकारच्या गोष्टींची तयारी करत असतो. आपण नात्याबाबत मनातल्या मनात अनेक विचार करत असतो.
(Image Credit : Aminat's Secret)
टेनसी युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांचं म्हणनं आहे की, कोणतंही नातं संपवण्याआधी आपण त्याबाबत पूर्णपणे विचार करत असतो. ही ब्रेकअपची पहिली स्टेज असते. यात आपण आपल्या ब्रेकअपबाबत स्पष्ट नसतो आणि स्वत:ला यासाठी तयार करत असतो.
(Image Credit : Mark Manson)
ते सांगतात की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत पूर्णपणे चिंतन केलेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की, नातं संपवणं हेच योग्य ठरेल तर या त्रासदायक नात्यात राहण्यापेक्षा ते संपवलेलं कधीही चांगलं.
(Image Credit : Thrive Global)
अभ्यासकांचं मत आहे की, ब्रेकअपची दुसरी स्टेज ही अवलोकन असते. तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये जे चिंतन केलेलं असतं, त्याचं तुम्ही अवलोकन करत असता. तुम्ही याबाबत विचार करता की, तुमचं रिलेशनशिप कुठे जात आहे? तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये वाढलेला दुरावा आणि हा दुरावा कसा कमी केला जाईल याचं अवलोकन करता, त्यानंतर निष्कर्षावर पोहोचता.
(Image Credit : Playbuzz)
जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपचं अवलोकन केल्यानंतक या स्टेजवर पोहोचले असाल की, ब्रेकअप करणेच ठीक आहे तर मन बदलू नका. कारण त्यानंतरही रिलेशनशिपमध्ये राहणं तुमच्यासाठी डोकेदुखीचं ठरू शकतं. त्यामुळे पुन्हा परत त्याच त्रास होत असलेल्या नात्यात जाणं टाळलं तरच तुम्ही शांततेने जगू शकाल.