म्हणून एकाच प्रोफेशनमध्ये असणारे कपल्स जास्त आनंदी असतात, 'असा' होतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:46 IST2020-04-10T14:30:46+5:302020-04-10T14:46:53+5:30
बॉलिवूडच्या किंवा इतर क्षेत्रातील अशा अनेक जोड्या तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला सेम प्रोफेशन असलेले कपल्स रिलेशनशिपमध्ये जास्त समाधानी आणि आनंदी का असतात. याबाबत सांगणार आहोत.

म्हणून एकाच प्रोफेशनमध्ये असणारे कपल्स जास्त आनंदी असतात, 'असा' होतो फायदा
दैनंदिन जीवन जगत असताना अनेकदा लोक बॉलिवुडच्या कपल्सची कॉपी करताना दिसून येतात. बॉलिवूड कपल्सची लाईफस्टाईल, त्यांचं वैवाहिक आयुष्य, प्रोफेशनल लाईफ वेगवेगळं असूनही साखरचं असल्यासारखं वाटत असतं. तुम्ही कधी विचार केलाय सेम प्रोफेशन असलेले कपल्स आपल्या लव्ह लाईफमध्ये जास्त आनंदी का असतात. बॉलिवूडच्या किंवा इतर क्षेत्रातील अशा अनेक जोड्या तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला सेम प्रोफेशन असलेले कपल्स जास्त रिलेशनशिपमध्ये जास्त समाधानी आणि आनंदी का असतात. याबाबत सांगणार आहोत.
एकमेकांनी समजून घेणं सोपं होतं
एकच प्रोफेशन असलेल्या कपल्सना असा फायदा असतो. की आपल्या कामाशी निगडीत असलेल्या समस्या ते एकमेकांशी खुलेपणाने शेअर करू शकता. जर पार्टनर कामात जास्त बिझी असेल तर तुम्ही सुद्धा वेळ पडल्यास मदत करू शकता. काहीवेळा एकाच प्रोफेशनमध्ये असलेल्या लोकांमध्ये एकमेकांवर जेलस होण्याची भावना निर्माण होते. पण या गोष्टी दोघांमध्ये अंडरस्टॅंडींग कसं आहे यावर अवलंबून असतात.
फॅमिली प्लॅनिंग
एकाच प्रोफेशनमध्ये असल्यामुळे कपल्स एकमेकांना सपोर्ट करत असतात. त्यांचे गोल्स, करिअर आणि घरातील जबाबदारीबाबत खुलेपणाने निर्णय घेतात. पार्टनरकडून चांगला फिडबॅकही मिळतो. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत आपलं फॅमिली प्लॅनिंगसुद्दा व्यवस्थित करतात. ( हे पण वाचा- दगा देणाऱ्या पुरूषांनासुद्धा महिला का माफ करतात, जाणून घ्या)
संवाद संपतं नाही
एकाच प्रोफेशनमध्ये असलेल्या कपल्सकडे बोलण्यासारखं खूप काही असंत. त्यांच्या गप्पा संपता संपत नाही. त्यामळे त्यांच्या नात्यात फ्रेशनेस टिकून राहतो. चांगल्या आयडीया, प्रेजेंटेशन यााबाबत देवाण-घेवाण करता येते. एकमेकांचे कामादरम्यानचे अनुभव शेअर करता येतात. तसंच वर्किंग अवर्स समजून घेऊन एकमेकांना वेळ देतात.या कारणांमुळे समान प्रोफेशन असलेले लोक परफेक्ट कपल्स असातात. ( हे पण वाचा-पार्टनरच्या चुकीच्या वागण्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे महिला सतत चिडचिड करतात)