(Image Credit : 99newser.com)

ब्रेकअप हे कुणासाठीही चांगलं नसतं. कारण ब्रेकअपमधून जो त्रास होतो तो कुणालाही नको असतो. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी कपल्समध्ये ब्रेकअप होतं. जसे की तुम्हाला माहीत आहे ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनाचा आणि राशींचा संबंध सांगण्यात आला आहे. त्यावरून अनेकजणांचे स्वभाव गुणही सांगितले जातात. त्यानुसार कोणत्या राशीच्या लोकांना ब्रेकअफ जास्त भारी पडतं हे जाणून घेऊया.

मेष : या लोकांचे ब्रेकअप फार होता. नंतर त्यांना पुन्हा रिलेशनशिपमध्येही राहण्याचीही घाई लागलेली असते. पण या लोकांना ब्रेकअपनंतर लगेच स्वत:ला सांभाळणं जरा कठीण असतं. आणि अशात स्थितीत हे लोक काहीही करण्याची शक्यता असते. असे लोक त्यांना आलेले वाईट अनुभव विसरण्याचाही प्रयत्न करतात.

वृषभ : या राशीचे लोकांसाठी ब्रेकअपनंतर पुढे जाणं फार कठीण असतं. पण सोबतच एकदा जर त्यांनी ब्रेकअप केलं तर, ते त्याच व्यक्तीसोबत पुन्हा रिलेशन ठेवत नाहीत. ब्रेकअपनंतर हे लोक पूर्णपणे तुटलेले असतात. अशात त्यांच्या आत राग, डिप्रेशन, दु:ख आणि द्वेष या भावना असतात. पण हे लोक पार्टनरच्या चांगल्या आठवणी आणि चांगल्या गोष्टीही आठवत असतात.

मिथुन :रिलेशनशिपबाबत या राशीचे लोक फार अजब असतात. हे लोक आता भलेही रिलेशनशिपमध्ये खूश असतील, पण काही दिवसांनी ते तक्रार करू लागतात. असे लोक त्यांची असंतुष्टी सहजपणे त्यांच्या हसण्यामागे लपवतात. या लोकांना जर रिलेशनशिप पसंत नसेल तर ते स्वत: वेगळे होतात आणि याचं त्यांना दु:खंही होत नाही.

कर्क : ब्रेकअपनंतर या राशीचे लोक त्यांच्या पार्टनरला इमोशनली हर्ट करू शकतात. संधी मिळाली तर हे लोक ब्लॅकमेल करण्यालाही मागेपुढे बघत नाहीत. पण जोपर्यंत हे  लोक रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यांचं प्रेम कमी नाही होत. मात्र, ब्रेकअपवर विश्वास ठेवायला यांना जरा वेळ लागतो.

सिंह : हे लोक नेहमी स्वत:ला बरोबर समजतात आणि त्यांच्या पार्टनरला चुकीचं. तसेच या लोकांना त्यांच्या पार्टनरने माफी मागितली तर त्यांना चांगलं वाटतं. ब्रेकअपनंतरही त्यांना वाटत असतं की, त्यांची पार्टनर परत येईल आणि त्यांच्यावर प्रेम करेल. 

कन्या : आपल्या ब्रेकअपनंतर हे लोक पार्टनरसोबत त्यांचे चांगले मित्र होऊ राहू शकतात. कारण पूर्णपणे वेगळं होणं यांच्यासाठी कठीण असतं. ब्रेकअपवेळी हे लोक रिलेशनशिप वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही. अशात ते पार्टनरला आनंदाने जाऊ देतात.

(Image credit : Twipu)

तुळ : ब्रेकअप झाल्यावर हे लोक दु:खी होतात, सोबतच त्यांना वाईटही वाटतं. यांना वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रेम करावं. पण ते या गोष्टीला पुढे जाण्याच्या रूपातही बघू शकतात.

वृश्चिक : हे लोक इमोशनल असतात, त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर दु:खीही होतात आणि स्वत:ला सांभाळू शकत नाहीत. जर ब्रेकअपला हे जबाबदार नसतील तर त्यांच्यात राग आणि आक्रामकपणा खूप असतो. प्रत्येक गोष्ट हे लोक मनावर घेतात.

धनु : या राशीच्या लोकांना ब्रेकअपने फार जास्त फरक पडत नाही. पण थोडं दु:खं होतं. पण हे लोक लवकरच लाइफमध्ये पुठे सरकतात. हे लोक एकाचवेळी एकापेक्षा अधिक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. अशात त्यांना जर एका पार्टनरने सोडलं तर या गोष्टीला फार सिरीअसली घेत नाहीत.

मकर : या राशीच्या लोकांना जेव्हा यांचे पार्टनर सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक गोष्टी समजून घेऊन अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पार्टनरपासून वेगळं व्हायचं नसतं. पण जर त्यांना कळालं की, त्यांचा पार्टनर त्याची फसवणूक करत आहे तर ही बाब सतत त्यांच्या मनात राहते. हे लोक स्वत:शी फार इमानदार असतात. 

(Image Credit : Patrika)

कुंभ : या राशीच्या लोकांना ब्रेकअपची चीड असते. तेच दुसरीकडे यांना कमिटमेंट ओझ वाटते. त्यामुळे लोक त्यांच्या पार्टनरला त्यांच्यानुसार वागायला भाग पाडतात. ब्रेकअपवेळी या लोकांच्या डोक्यात अनेक नकारात्मक विचार आणि राग असतो.

मीन : ब्रेकअपवेळी हे लोक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. पण हे लोक रिलेशनशिप सांभाळण्याचा प्रयत्न नक्की करतात. पण पार्टनरला सोडणं यांना सोपं वाटतं. 


Web Title: How The Zodiac Signs Act After A Breakup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.