वर्क फ्रॉम होममधून कसा काढाला मुलांसाठी वेळ? तुमच्यासाठी साध्या सोप्या टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:13 IST2021-05-31T22:12:38+5:302021-05-31T22:13:11+5:30
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, अगदी वर्क फ्रॉम होम असूनही ते शक्य होत नाही. या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता. कसा? वाचा या खास टीप्स तुमच्यासाठी

वर्क फ्रॉम होममधून कसा काढाला मुलांसाठी वेळ? तुमच्यासाठी साध्या सोप्या टीप्स
आजकालचे जीवन म्हणजे शर्यत झाली आहे. या शर्यतीत सर्वचजण धावत असतात. या स्पर्धेच्या युगात आईवडिलांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, अगदी वर्क फ्रॉम होम असूनही ते शक्य होत नाही. या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता. कसा? वाचा या खास टीप्स तुमच्यासाठी
मोबाईलपासून दूर राहा
वर्क फ्रॉम होममध्ये पालकांनी मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी बाजूला सारून काही वेळ आपल्या मुलांसह व्यतीत करावा. त्यामुळे मुलं दिवसभरातील त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतील.
मुलांसोबत नियमित व्यायाम करा
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही त्यात सामील करा. त्यांनाही तुमच्यासोबत वॉक करायला शिकवा. त्यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागून आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.
घरातील कामांतून वेळ काढा
घऱातील कामे झटपट आवरून तो वेळ मुलांसाठी द्या. तुम्ही घरकामातही छोटी आणि सोपी कामे मुलांना करण्यास सांगू शकता. त्यामुळे ते तुमच्यासोबत वेळही घालवू शकतील आणि त्यांना काम करण्याची सवयही लागेल.