मुलांना किंवा मुलींना आकर्षीत करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असता. कारण एखादी व्यक्ती  जर आपल्याला आवडत असेल तर काय केल्याने ती व्यक्ती आपल्याला पसंत  करेल असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का काही विशिष्ट गोष्टींमुळे मुलं मुलींना लाईक करत असतात . आज आम्ही ज्या टिप्स देणार आहोत त्या खास मुलींसाठी आहेत या टिप्सचा वापर करून तुम्ही एखाद्या मुलाला लाईक करत असाल तर त्याला इम्प्रेस करू शकता.

ब्युटी विथ ब्रेन

Image result for beauty with brains

मुलांना खास करून अशा मुली आवडतात ज्या हूशार सुद्धा असतात आणि दिसायला सुद्धा सुंदर असतात. तुमच्यातील आत्मविश्वास नेहमीच मुलांवर प्रभाव टाकत असतो.  ज्या मुलींचे राहणीमान चांगलं असतं तसंच त्या मुली चांगल्या हूद्द्यावर काम करत असतात अशा मुली मुलींसोबत लग्न करावसं  मुलांना वाटतं असतं. (हे पण वाचा-'या' गोष्टी ठरवत असतात तुमचं नातं किती काळ टिकेल आणि किती नाही!)

फिटनेस

मुलांना फिटनेसच्या बाबतीत जागरूक असलेल्या मुली आवडत असतात.  घरातली कामं आणि शिक्षण सांभाळत असलेल्या मुली मुलांचं नेहमीच लक्ष वेधू घेत असतात.  त्याचसोबत  आकर्षक शरीरयष्टी असलेल्या मुली मुलांना आवडत असतात. कारण शारीरिकदृष्या  फिट असलेल्या मुली फिट नसलेल्या मुलींच्या तुलनेत जास्त प्रभावी दिसत असतात जर तुम्हाला सुद्धा  तुमचं शरीर चांगल आणि फिट ठेवायचं असेल तर सगळ्यात आधी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. शक्य असल्यास दररोज व्यायाम करा. 

जेवण बनवणे

Image result for cooking(image credit-thrive global)

ज्या मुलींना चांगला स्वयंपाक तयार करता येत असतो. अशा मुली मुलांना आवडतात. कारण जर पोटाची भूक व्यवस्थित भागली जर सगळ्याच बाबतीत मुलं तुमच्यावर खूश राहू शकतात. त्यामुळे तुम्हाला  थोडंफार का होईना जेवण बनवता येणं गरजेचं आहे. मुलींच्या हातंच चविष्ट जेवण खाण्यासाठी मुलं खूप आतूर झालेले असतात  म्हणूनच  जर तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरसाठी कधीतरी स्वतः तयार केलेला पदार्थ खाण्यासाठी घेऊन जा. त्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर नक्कीच खूश होईल. (हे पण वाचा-मुलांचे लुक्स आणि बॉडी नाही, तर 'या' गोष्टी नोटीस करून मुली देतात होकार...)

सेल्फ डिफेंस

Image result for self defence(image credit- medical express)

मुलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पात्र असलेल्या मुली खूप आवडतात. कारण जर तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी सक्षम असाल तर  मुलांना  हे खूप आवडत असतं.  कारण अनेक मुलींमध्ये आत्मविश्वासाची कमरता असते . त्यामुळे मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम पडत असतो. म्हणून मुलींना जर एखाद्या मुलाला आकर्षीत करायचं असेल तर मानसीक आणि शारीरिकदृष्या  स्ट्राँग असणं फायदयाचे ठरेल.

Web Title: How to impress a boy with easy methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.