शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

Happy Daughter Day : ... त्यामुळे वडिलच असतात मुलींसाठी 'सुपरहिरो'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 11:33 AM

वडिल अन् मुलाच्या नात्यात एक वेगळंच अंतर असतं. पण, वडिल अन् मुलीच्या बॉण्डींगच एक वेगळचं नात असतं.

मुंबई - आज देशभरात डॉटर डे म्हणजे लाडक्या लेकीचा दिवस साजरा करण्यात येत आहे. आई-वडिलांकडून आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवसं. आई आणि वडिलांकडून मुलीला सारखचं प्रेम मिळतं. पण, कुठेतरी या प्रेमात वडिलांची बाजू वरचढ ठरते. कारण, वडिलांच्या कुशीतील मायेची उब लेकीला थोडी अधिकच भावूक करते. तर कितीही रागीट किंवा गरम असलेल्या बाबाला लेकं आपल्या एका स्माईलने नरम करते. आपल्या लेकीच्या एका हास्यापुढे कणखर बापही कापसासारखा मऊ होऊन जातो. 

वडिल अन् मुलाच्या नात्यात एक वेगळंच अंतर असतं. पण, वडिल अन् मुलीच्या बॉण्डींगच एक वेगळचं नात असतं. त्यामुळे मुलावर रागावणार, चिडणारा बाप मुलीसमोर आईस्क्रीमसारखा पिघळून जातो. आपल्या लाडक्या लेकींचा हट्ट पुरवण्यासाठी तो काबाडकष्ट करतो, तर वेळप्रसंगी जगभराशी लढाईची तयारीही ठेवतो. 

त्यामुळे मुलगी असते बाबांसाठी खास वडिलांच्या कुशीत मुलींना जास्त माया अन् सुरक्षितता मिळाल्याचे वाटते. वडिल नेहमीच आपल्या मुलींची काळजी घेताना त्यांना तळहातातील फोडाप्रमाणे जपतात, त्यामुळे मुलींही वडिलांच्या कुशीत स्वत:ला सुरक्षित समजतात. 

मुलींच्या आयुष्यात वडिलचं नेहमी सुपरहिरो असतात, त्यामुळे पती जरी हिरो असला तर वडिलचं सुपरहिरो असतात. कारण, वडिलांकडून मुलींची सर्वच इच्छापूर्ती केली जाते. 

घरात चिमुकल्या मुला-मुलींच्या भांडणात नेहमीच आईकडून मुलांची तर वडिलांकडून मुलीची बाजू घेण्यात येते. मुली आणि वडिलांच्या मैत्रीचंही एक वेगळचं नात असतं. वडिलचं आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे, असं मुलींना वाटतं. त्यामुळे वडिल हेच मुलींचे पहिला मित्र असतात. 

मुलींना अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेतील अॅडमिशनपासून ते नोकरीच्या इंटरव्यूवपर्यंत वडिलांचा नेहमीच सपोर्ट असतो. वडिलांचे लाड अन् प्रेम नेहमीच मुलींना काळजीवाहू बनवतेय. 

मुलीच्या लग्नादिवशी डोक्यावर फेटा बांधून धावपळ करणारा, येणाऱ्या पाहुण्यांना अगदी लवून, हात जोडून नमस्कार करणारा बाप मुलीची पाठवणी करताना धाय मोकळून रडतो.

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनrelationshipरिलेशनशिप