गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:37 PM2020-02-20T15:37:07+5:302020-02-20T15:46:43+5:30

आज नाही तर उद्या पार्टनरचे घरचे तुम्हाला होकार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपर्क थांबवू नका.

Girlfriends parents if not ready for marriage tips for console them | गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!

गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!

googlenewsNext

(image credit- shutterstock)

रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येत असतो. तो म्हणजे लग्न करताना. कारण अनेकदा लव्ह मॅरेज करत असताना मुलीच्या आई बाबांच्या खूप अटी असतात. अशावेळी चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा समजदारीने सुद्धा तुम्ही आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता.  कारण बरेच कपल्स होकार मिळाला नाही तर पार्टनरसोबत पळून लग्न करण्याच्या मार्गाचा अवलंब करतात. 

(image credit-density church international)

तुमच्या आयुष्यात कधीही अशी सिच्युएशन आली तरी तुम्ही आपल्या पार्टनरच्या घरच्यांना विश्वास द्या की तुम्ही त्यांच्या मुलीला खुश ठेवाल.  आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही पार्टनरच्या घरच्यांना लग्नासाठी तयार करू शकता. 

शांत रहा

(image credit- pinterest)

अनेकदा आपल्या मुलीने स्वतःचं निर्णय घेतला असेल तर  पालकांना ही गोष्ट पचवण्यास खूपच कठिण जात असते. अशावेळी तुम्ही शांत रहा. गर्लफ्रेंडच्या घरच्यांना आपली  गोष्ट पटवून देण्यासाठी आक्रमकपणा न करता शांत रहा. जर पार्टनरच्या आईवडिलांनी तुम्हाला नकार दिला तर निराश होऊ नका. तुम्ही पार्टनरच्या घरातील इतर व्यक्ती भाऊ,  बहिण, वहिनी तसंच  जवळच्या वाटत असलेल्या लोकांशी बोलून घरात तुमच्याबद्दल काय वातावरण आहे, काय चर्चा होत आहेत. याविषयी माहिती मिळवू शकता.

हिंमत ठेवा

(image credit-Nami connecicut)

जरी तुम्हाला  नकार मिळाला असेल तर आशेचा किरण तुमच्या मनात असू द्या . कारण आज नाही तर उद्या पार्टनरच्या घरचे तुम्हाला होकार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपर्क थांबवू नका.

कम्युनिकेशन गॅप ठेवू नका

कम्युनिकेशन काहीही ठोस कारण नसताना बंद केलं तर हीच गोष्ट तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून जरी तुम्हाला नकार मिळाला असेल तर बोलणं थांबवू नका. जास्त वेळ देणं शक्य नसल्यास पार्टनरशी निदान फोनवर तरी बोलण्याचा प्रयत्न करा. पार्टनरकडून होकार हवा असेल तर पार्टनरच्या घरच्यांच्या नजेरत रहा. काही दिवसांनंतर भेटण्याचा प्रयत्न करा.  जरी गर्लफ्रेंडचे पालक तुम्हाला भेटायला तयार  नसतील तरी तुमच्या पालकांना पार्टनरला भेटू द्या. कारण त्यामुळे एक वेगळं बोडिंग तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये तयार होईल. ( हे पण वाचा-मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं)

इमेज बिल्डिंग 

इमेज बिल्डींग अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे पॉजिटिव्ह गोष्टींना समोरच्या व्यक्तीच्या माईंडमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पार्टनरला असं सांगा की  जेव्हा ती तीच्या पालकांसमोर तुमचा विषय काढेल त्यावेळी  शक्यतो सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न असावा. त्यासाठी आईशी बोलत असताना तुमच्याबद्दल सकारात्मक  गोष्टीं पार्टनरला मांडायला सांगा. म्हणजे आपोआपच तुमचे चांगले गुण पालकांपर्यंत पोहोचतील. ( हे पण वाचा- लग्न झाल्यानंतर 'या' चुका कराल, तर पार्टनर कधी सोडून जाईल कळणार सुद्धा नाही!)

Web Title: Girlfriends parents if not ready for marriage tips for console them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.