काय आहे 'इमोशनल स्ट्रेन' ज्यामुळे ए आर रहमानचा होत आहे घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:37 IST2024-11-20T13:35:29+5:302024-11-20T13:37:19+5:30

AR Rahman divorce : २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Emotional Strain is reasons behind AR Rahman and Saira Banu divorce, know what is it | काय आहे 'इमोशनल स्ट्रेन' ज्यामुळे ए आर रहमानचा होत आहे घटस्फोट?

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन' ज्यामुळे ए आर रहमानचा होत आहे घटस्फोट?

AR Rahman divorce : भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए आर रहमान हे पत्नी सायरा बानूपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा समोर आली आहे. 12, मार्च 1995 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. दोघांना २ मुली आणि एक मुलगा आहे. आता २९ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. 

सायरा बानू यांनी मंगळावारी रात्री पतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. ही बातमी समोर येताच ए आर रहमानच्या फॅन्सना धक्का बसला. २९ वर्षाचं दोघांचं नातं तुटण्यामागचं कारण इमोशनल स्ट्रेन असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, नात्यात इमोशनल स्ट्रेन काय असतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

घटस्फोटाचं कारण...

सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी त्यांच्या क्लाएंटकडून जाहीर करत लिहिलं की, अनेक वर्षांच्या संसारानंतर मिसेज सायरा बानू यांनी पती ए आर रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण नात्यात इमोशनल स्ट्रेन आहे. भरपूर प्रेम असूनही दोघांनाही असं जाणवलं की, तणावामुळे दोघांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सायरा यांनी या गोष्टीवर जोर दिला की, हा निर्णय नात्यात असलेल्या वेदनेमुळे घेण्यात आला आहे.

रहमान यांनी व्यक्त केलं दु:खं

दुसरीकडे ए आर रहमान यांनीही एक्सवर पोस्ट करत आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "अपेक्षा होती की, आम्ही ३० वर्ष संसार पूर्ण करू. पण, असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक न दिसणारा अंत असतो. तुटलेल्या हृदयाच्या वजनाने देवाचं सिंहासनही हलत असेल'. यावेळी त्यांनी प्रायव्हसी दिल्याबद्दल फॅन्सचे आभार मानले.

काय आहे 'इमोशनल स्ट्रेन'?

ए आर रहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाचं कारण 'इमोशनल स्ट्रेन' असून प्रत्येक कपलने हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखाद्या नात्यात वाढतं अंतर स्ट्रेसचं कारण बनतं तेव्हा त्याला इमोशनल स्ट्रेन म्हटलं जातं. याची वेगवेगळी कारणे असतात. जसे की, कम्युनिकेशन गॅप, विश्वास कमी असल्याने संशय वाढणे इत्यादी.

त्याशिवाय नात्यात गमावलेला विश्वास स्ट्रेसचं सगळ्यात कॉमन कारण बनतं. प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा आणि मग त्या पूर्ण न होणंही कारण ठरतं. नात्यात होत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस वाढतो.

'इमोशनल स्ट्रेन'सोबत कसं डील कराल?

- एक्सपर्टनुसार, 'इमोशनल स्ट्रेन' सोबत लढण्यासाठी दोघांमध्ये संवाद होणं महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही समस्या सांगणारच नाही तर त्याचं समाधान कसं निघेल? नात्यात दोघांमध्ये भरपूर संवाद होणं मजूबत नात्याची खूण आहे. 

- या कठिण काळातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला माइंड डायवर्ट करावा लागेल. जर तुम्ही एकाच गोष्टीबाबत विचार करत रहाल तर तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतील. अशात तुम्ही सोशल मीडिया, इंटरनेट किंवा फिजिकल अॅक्टिविटी, आवडीच्या गोष्टींमध्ये लक्ष घाला.

Web Title: Emotional Strain is reasons behind AR Rahman and Saira Banu divorce, know what is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.