Relationship Tips: प्रेमात फार गरजेची आहे 'ही' गोष्ट, का कुणासाठी प्रेमाचा ऑप्शन बनावं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:35 IST2019-08-16T14:24:33+5:302019-08-16T14:35:31+5:30
प्रेमात एखाद्याला सोडून देणे किंवा एखाद्याकडून सोडून दिलं जाणं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याहूनही सर्वात वाइट स्थिती असते ती म्हणजे ब्रेकअपचा सामना करणं.

Relationship Tips: प्रेमात फार गरजेची आहे 'ही' गोष्ट, का कुणासाठी प्रेमाचा ऑप्शन बनावं?
(Image Credit : www.firstlookfamilylaw.com)
प्रेमात एखाद्याला सोडून देणं किंवा एखाद्याकडून सोडून दिलं जाणं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याहूनही सर्वात वाइट स्थिती असते ती म्हणजे ब्रेकअपचा सामना करणं. यातून बाहेर पडायला वेळ नक्कीच लागतो खरा मात्र यातून बाहेर येऊ शकता. मात्र, या तिनही गोष्टींपेक्षा अधिक वाइट स्थिती काय असते ती आम्ही सांगणार आहोत. ती स्थिती म्हणजे एखाद्याच्या लव्ह लाइफसाठी तुम्ही ऑप्शन सारखं असणे. तुम्ही म्हणाल असं कसं? तुम्ही जर अशा स्थितीतून गेले नसाल कर आजूबाजूला बघितल्यावर तुम्हाला असं चित्र नक्कीच बघायला मिळेल.
असं का होतं?
तुम्ही कुणाशी इमोशनली जोडले गेलेले असाल. फक्त जोडले गेले नसाल, त्या व्यक्तीवर प्रेम करत असाल. पण ती व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीसाठी क्रेझी आहे. त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत भांडण झालं किंवा काही अडचण आली तर त्याला किंवा तिली तुमची गरज भासते. असं केवळ मैत्रीच्या नात्यात ठीक आहे. पण जर नातं मैत्रीच्या पलिकडलं असेल तर ही स्थिती ठीक नाही.
बॅक सपोर्ट आणि स्टॅंड बाय रोमॅंटिक ऑप्शन
एखाद्या आयुष्यात तुम्ही पर्यायासारखे असाल तर यापेक्षा भावनात्मकदृष्ट्या वाइट काहीच होऊ शकत नाही. कारण या स्थितीत तुमचं नातं दुसऱ्या व्यक्तीच्या मूड आणि नात्यांवर निर्भर असतं. त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळंकाही ठीक असेल तर तुमची त्यांना गरज पडत नाही. आणि काही अडचणी असतली तर तुम्ही त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन असता. म्हणजे याला एखाद्या मित्रासारखा बॅक सपोर्ट देणं म्हणता येणार नाही. याला स्टॅंड बाय रोमॅंटिक ऑप्शन म्हटलं जातं. म्हणजे, कुछ नहीं तो तुम ही सही...
स्वत:ला विचारा प्रश्न
अशाप्रकारच्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या भावनात्मक कमजोरींवर नियंत्रण मिळवून स्वत:ला प्रश्न विचारायला हवा. तुम्हाला तुमच्या या नात्यातून काय हवंय? तुमची स्वप्ने काय आहेत? त्या स्थितीत काय होईल जेव्हा ऑप्शन म्हणून तुमचा वापर करणारी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे एकटं सोडून त्याच्या किंवा तिच्या लाइफमध्ये बिझी होईल?
खऱ्या प्रेमाचा शोध
या स्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे फिरणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं. या नव्या सुरूवातीमध्येच तुम्हाला हे जाणवेल की, तुमचं महत्व काय आहे. तुम्ही जर स्वत:ची किंमत करणार नाही तर दुसरे तुमची किंमत का करतील? त्यामुळे स्वत:ला महत्त्व द्याल तर दुसऱ्यांसाठीही तुम्ही महत्त्वाचे व्हाल.
पुढच्यावेळी कसे भेटाल?
काही अडचण आल्यावर तुम्हाला ऑप्शनसारखं वापरणारी व्यक्ती तुमच्या समोर आली तर काय कराल? यावेळी त्या व्यक्तीला सांगा की, तुम्ही त्याला किंवा तिला हवे असाल तर त्यासाठी त्यांना मेहनत करावी लागेल. त्यांना तुमची किंमत करावी लागेल, तुम्हाला जिंकावं लागे आणि त्यानंतर तुमचं प्रेम मिळवावं लागेल'.