शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

लॉकडाऊनमध्ये भांडणं नको असतील तर, प्रत्येक कपल्सने वापरायला हव्यात 'या' खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 1:39 PM

रिलेशनशिपमध्ये जर प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील याबाबत सांगणार आहोत.

कोरोनाचं व्हायरसचं संक्रमण संपूर्ण भारतात वाढत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आ़हे. त्यामुळे घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. कुठेही बाहेर जाता येत नाही, चोवीस तास घरी राहावं लागतं. यामुळे अनेकांची चिडचिड होत आहे. याचा परिणाम म्हणून पती- पत्नीत भांडण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  

घरातली काम, मुलांना सांभळणं किंवा मग ऑफिसचं काम असेल सध्या सर्वच आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये कामाचा ताळमेळ बसवणं कठीण होत जातंय. रिलेशनशिपमध्ये जर प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील याबाबत सांगणार आहोत. या टिप्सचा वापर कराल तर लॉकडाऊनमध्ये एका खोलीत बंद असून सुद्धा तुम्ही आपल्या पार्टनरसोबत आनंदाने राहू शकता. 

पार्टनरकडे दुर्लक्ष करू नका

अनेकजण वर्क फ्रॉम होम असल्यानं कामाचा अतिरिक्त ताण आहे. पण यामध्ये आपल्या पार्टनरकडे दुर्लक्ष करु नका. काम करत असताना पार्टनरशी अधेमधे आवश्य बोला. कधीतरी स्वतः कॉफी किंवा चहा  बनवून पार्टनरला द्या. गप्पा मारून ताण हलका करण्याचा प्रयत्न करा.

स्पेस द्या

भांडण होऊ नये म्हणून पार्टनरला स्पेस द्या. त्याला त्याच्या आवडीचं काम करु द्या. काही वेळ त्याला एकटं राहू द्या. वेगवेगळ्या रुममध्ये बसून आपल्या आवडीची काम करा. जसं पुस्तक वाचणं, वेब सीरिज पाहाणं, एखादा छंद जोपासू द्या.  सध्या प्रत्येकजण आपला पूर्ण वेळ आपल्या पार्टनरला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांची दाद आवश्य द्या. तुमची छोटीशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. ( हे पण वाचा-पार्टनरच्या चुकीच्या वागण्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे महिला सतत चिडचिड करतात)

नेहमी पॉजिटिव्ह रहा

कोणतीही समस्या असेल तर आपल्या पार्टनरशी बसून बोला. ती समस्या कशी सोडवायची यावर चर्चा करा. जबाबदाऱ्या समप्रमाणात वाटून घ्या. पुढच्या दिवसाची सुरुवात कशी करायची हे एकत्र बसून ठरवा. पार्टनरसोबतच नातं मजबूत ठेवायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. स्वतःला तणावमुक्त ठेवा.  ( हे पण वाचा-म्हणून एकाच प्रोफेशनमध्ये असणारे कपल्स जास्त आनंदी असतात, 'असा' होतो फायदा)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप