लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:48 IST2019-04-25T14:35:36+5:302019-04-25T14:48:13+5:30
लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो.

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?
(Image Credit : annecohenwrites.com)
लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. त्यांना त्यांच्या नात्यात नवा उत्साह आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे सल्ले दिले जातात. त्यांना पुन्हा डेट्सवर जाण्यासाठी सांगितलं जातं. खारकरुन स्पेशल डे असेल तेव्हा. पण वैवाहिक जीवन संतुष्टपूर्ण राहण्यासाठी केवळ डेट्सच नाही तर सिंगलहुडही फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ कसं....
एकटं रहतात
लोक त्यांच्या लग्नाला कितीही महत्व देत असतील पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोक एकटा वेळ घालवतात. आजकाल लोक जितका जास्त एकट्यात वेळ घालवतात तेवढा ते आधी कधीही घालवत नव्हते.
उशीरा व्हावं लग्न
असे म्हटले जाते की, ऐन तारुण्यात लग्न केल्याने लग्न फार जास्त काळ टिकतं. पण काही लोक याच्या उलट विचार करतात. उशीरा लग्न केल्याने तुम्हाला जास्त शिक्षण घेण्याचीही संधी मिळते आणि स्वत:ला आर्थिक रुपाने सक्षम करण्याचीही संधी मिळते.
सिंगलहुडचे फायदे
(Image Credit : Daily Mail)
लग्नाआधी जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा तुम्ही वेगवेगळी कामे शिकत असता. याने लग्नानंतर पार्टनर काही दिवसांसाठी बाहेर गेल्यास अडचण येत नाही.
सोशल नेटवर्क मोठं ठेवा
लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक समाजाशी अधिक जुळलेले असतात. त्यांचं सोशल नेटवर्क मोठं असतं, तर लग्न झालेले लोक एकमेकांमध्ये त्यांचं विश्व तयार करत असतात.
आरोग्यासाठी चांगलं
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, सामाजिक उठबस वाढवल्याने तेवढंच वय वाढतं जेवढं धुम्रपान सोडल्याने वाढतं.
मित्रांना भेटणं नातं करेल मजबूत
एका रिसर्चनुसार, म्हातारपणात परिवारापेक्षाही जास्त मित्रांची मदत होते. मित्रांशी भेटीगाठीमुळे वैवाहिक जीवनातील तणावही कमी होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफमधील छोट्या छोट्या गोष्टी मित्रांशी शेअर करता तेव्हा याने लग्न आणखी मजबूत होतं.