शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

बी माय व्हॅलेन्टाइन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 5:36 PM

बघा, अंगावर तेच रोमांच पुन्हा उभे राहतात की नाही?..

ठळक मुद्देप्रेम नवीन असो, अथवा मुरलेलं, ओठांवर येण्याचं आता थिजलेलं..हातात हात घेऊन जा पुन्हा एकदा ‘त्याच’ रस्त्यावरुन फिरत..बघा, पुन्हा ती धडधड, ती हुरहुर तुम्हाला जाणवते की नाही?..बघा, ती याद पुन्हा येते की नाही?..

- मयूर पठाडेप्रेमाला, प्रेमाच्या दिवसाला आता तारखेचं कोंदण मिळालेलं असलं, १४ फेब्रुवारी या प्रेमाच्या दिवसांत तुमचं प्रेम बंदिस्त झालेलं असलं, तरी प्रेम असं एका दिवसांत थोडी मोजता येतं, करता येतं आणि व्यक्त करता येतं?..आपल्या प्रेमाचा व्हॅलेन्टाइन्स डे तर तसा रोजचाच असतो..तरीही आजच्या या दिवसाविषयी खास..आपला रोजचाच दिवस व्हॅलेन्टाइन्स डे कसा करायचा?..मोठमोठ्या गोष्टींत, लंब्याचवड्या भाषणबाजीत, चॉँद-तारे तोडून तिच्या केसात माळण्याच्या रोमॅँटिक कल्पनांत, महागड्या गिफ्ट्समध्ये हे प्रेम नसतंच.. कल्पना कितीही रोमॅँटिक असल्या तरी वास्तवाचं भान आणि त्याला वास्तवातच दिलेली कृतीची जोडच महत्त्वाची..नुसत्या सहवासाची ती गोड गुलाबी आठवणही मग तुमच्या त्या क्षणाला व्हॅलेन्टाइन्स डेचं माधुर्य आणू शकते..आठवा पहिल्यांदा तुमची कधी नजरानजर झाली होती, पहिल्यांदा तुम्ही कधी एकमेकांचा हात हातात घेतला होता, पहिल्यांदा कधी (चोरुन) एकत्र सिनेमा पाहिला होता.. आठवा तुमची पहिली भेट, पहिलं हॉटेल, पहिली ट्रिप.. पहिली लॉँग राईड.. आणि पहिल्यांदा एकमेकांमध्ये जाणवलेला पहिला स्पार्क..करा शेअर ते परत एकदा एकमेकांमध्ये..तुमचं प्रेम नवीन असो, अथवा मुरलेलं, ओठांवर येण्याचं आता थिजलेलं..लंच किंवा डिनरला नेण्यापेक्षा, न्या आपल्या पार्टनरला ब्रंचला..बघा, पुन्हा ती धडधड, ती हुरहुर तुम्हाला जाणवते की नाही?..हातात हात घेऊन जा पुन्हा एकदा ‘त्याच’ रस्त्यावरुन फिरत..बघा, ती याद येते की नाही?..त्यावेळचे ढग आकाशात दाटून येतात की नाही?भर उन्हात एकांतातल्या झाडाखाली उभं राहिल्यानंतरची गार वाºयाची ती झुळुक पुन्हा स्पर्शून जाते की नाही?..अंगावर तेच रोमांच पुन्हा उभे राहतात की नाही?..बी माय व्हॅलेन्टाईन..हे मग शब्द राहत नाहीत, उरतो तो एक कायमस्वरुपी जिवंत अनुभव..