(Image Credit : Amar Ujala)
जास्तीत जास्त तरूण हे त्यांचं प्रोफाइल इम्प्रेसिव्ह करण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर प्रोफाइल फोटो ठेवतात. त्यांना वाटत असतं की, त्यांचा हा भारीवाला प्रोफाइल फोटो पाहून तरूणी सोशल मीडियावर त्यांच्या इंटरेस्ट दाखवतील. पण असं नाहीये. तरूणी केवळ प्रोफाइल फोटो पाहून तुमच्यात इंटरेस्ट दाखवत नाहीत.
तरूणी तुमच्या प्रोफाइलमधील वेगवेगळ्या गोष्टी चेक करतात. अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाहीत. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊ तरूणी तुमच्या प्रोफाइलमधील
तुम्ही काय करता
तरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये सर्वातआधी तुम्ही काय करता किंवा तुम्ही कोणती नोकरी करता हे बघतात. इंजिनिअर, डॉक्टरसोबतच मोठं करिअर असलेल्या किंवा नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असाल तर तुमचं प्रोफाइल मुलींना पसंत येऊ शकतं. तसेच तरूणी बिझनेसमन लिहिणाऱ्या तरूणांचं प्रोफाइल कधीच लाइक करत नाहीत.
फोटो गॅलरी
तरूणी भलेही प्रोफाइल फोटोवर लक्ष देतील किंवा नाही, पण तुमच्या प्रोफाइलमधील गॅलरीमध्ये नक्कीच डोकावतील. तरूणींना हे जाणून घ्यायचं असतं की, तुम्ही कशाप्रकारची लाइफस्टाईल जगता. तुम्ही किती कूल आहात. त्या तुमचे सगळे फोटो बारकाईने बघतील मग ठरवतील की, तुमची आणि त्यांची मैत्री होऊ शकते की नाही.
मॅरिटिअल स्टेटस
अर्थातच तरूणी कोणत्याही प्रोफाइलमध्ये मॅरेज स्टेटस बघतात. पण जर तुमचं लग्न झालेलं असे तर स्टेटस सिंगल ठेवण्याची चूक करू नका. हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहेच, सोबतच तुमच्या प्रोफाइलवर कुणी विश्वासही करणार नाही. त्यासोबतच तरूणी फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवताना हे बघतात की, तुमच्यात आणि त्यांच्यात किती कॉमन फ्रेन्ड आहेत.
लाइक पेजेस
तरूणी तुमच्या सोशल मीडियात अकाउंटमध्येही हेही बघतात की, तुम्ही कशाप्रकारचे पेजेस लाइक केलेले आहेत. यावरून तुमच्या आणि तिच्या आवडी-निवडी जुळतात की नाही हे तपासतात. तसेच विचारही यावरून कळून येतात. जर काही साम्य आढळलं नाही तर त्या तुम्हाला फॉलो करणार नाहीत.