खेड : आधीच दोघींशी लग्नगाठ बांधून तिसरीसोबत साखरपुडा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खेड तालुक्यातील जामगे येथील दादल्याच्या नेरळ पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. योगेश यशवंत हुमणे असे त्याचे नाव असून, पाेलिस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी त्याची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.याप्रकरणी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील ३४ वर्षीय विवाहितेने केलेल्या फिर्यादीनंतर सर्व कारनामे समाेर आले. विवाहितेने पतीविरोधात मानसिक छळ, आर्थिक फसवणूक तसेच तो विवाहित असताना फसवणूक करून तिच्याशी लग्न केल्याचे म्हटले होते. त्यानंतर योगेश हुमणे याच्याविरोधात नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.पाेलिस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी मोठ्या शिताफीने याेगेश याला अटक केली. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच सगळे काळे कारनामे बाहेर आले. याेगेश विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. त्याने दोन लग्ने करून आता तिसऱ्या मुलींशी लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम केला होता. त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणे सुरू केले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
पाेलिसांच्या सापळ्यात अडकलायाेगेश हुमणे याला पकडण्यासाठी पाेलिसांनी एक सापळा रचला होता. योगेशने पत्नीच्या नावे कार खरेदी केली होती. ती त्याला त्याच्या नावावर करायची हाेती. त्यामुळे ताे पत्नीला भेटायला येणार हे पाेलिसांना माहीत हाेते. त्यानुसार पाेलिसांनी सापळा रचला आणि पत्नीला भेटायला आलेला योगेश नेरळ पोलिसांच्या तावडीत सापडला.
साेशल मीडियाद्वारे ओळखलग्न होत नसल्यास, घटस्फोटीत असल्यास किंवा लग्नाला उशीर होत असेल तर काहीजण सोशल मीडियाचा आधार घेतात. अशा महिलांना योगेश लक्ष्य करत होता. त्यांच्याशी ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करायचा.
महिला पाेलिसही बळीफसवणूक झालेल्या महिलांमध्ये एका महिला हवालदाराचाही समावेश आहे. नेरळ परिसरातील अशा दोन आरोपीना नेरळ पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.