रत्नागिरीमध्ये बेशुद्धावस्थेत तरुणी सापडली, अंगावर ओरखडे असल्याने संशय
By मनोज मुळ्ये | Updated: August 26, 2024 15:24 IST2024-08-26T15:23:35+5:302024-08-26T15:24:47+5:30
बदलापूरच्या घटनेमुळे लोकांमध्ये या विषयी प्रचंड संतापाचे वातावरण

रत्नागिरीमध्ये बेशुद्धावस्थेत तरुणी सापडली, अंगावर ओरखडे असल्याने संशय
रत्नागिरी : शहरालगतच्या चंपक मैदानावर सोमवारी सकाळी एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या अंगावर ओरखडे असल्याची माहिती पुढे येत असल्याने सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत वाढत असल्याने सध्या याच विषयावर सर्वत्र चर्चा सुरू असते. अलीकडेच घडलेल्या बदलापूरच्या घटनेमुळे लोकांमध्ये या विषयाबाबत प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी चंपक मैदानावर एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. तिच्या अंगावर ओरखडे असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे.