आई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:52 IST2019-10-10T16:49:40+5:302019-10-10T16:52:48+5:30

किरकोळ कारणावरून आई रागावल्याने २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रायपाटण मधील टक्केवाडी येथे घडली. सायली संजय शेटे असे या तरूणीचे नाव आहे.

A young woman commits suicide after she's angry | आई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्या

आई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्या

ठळक मुद्देआई रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्यापोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद

राजापूर : किरकोळ कारणावरून आई रागावल्याने २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रायपाटण मधील टक्केवाडी येथे घडली. सायली संजय शेटे असे या तरूणीचे नाव आहे.

शेटे कुटुंबाकडे असलेल्या पाळीव श्वानाला बिबट्याने पकडले होते. मात्र, त्यातून तो वाचला होता. त्यामुळे श्वानाला घरात ठेवावे, असे सायलीने सांगताच तिची आई तिच्यावर रागावली होती. त्यामुळे सायलीने मंगळवारी रात्री पावणेदहा ते दहा यावेळात घरातील बाथरुमच्या दरवाजाजवळ साडीने गळफास घेतला. हा प्रकार नंतर घरच्यांचा लक्षात आला.

त्या दरम्यान सायली बेशुध्द होती. अधिक उपचारासाठी तिला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन जाधव करीत आहेत.

Web Title: A young woman commits suicide after she's angry