रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:37 IST2019-06-06T19:36:07+5:302019-06-06T19:37:09+5:30

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेतून खालीपडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. दिनेश विनोद शिर्के (३१, विरार मुंबई) असे मृत तरूणाचे नाव आहे.

Young Virar, who passed away from the train, died | रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचा

रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचा

ठळक मुद्देरेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडलेला तरूण विरारचारेल्वे प्रशासन, संगमेश्वर पोलीसांना खबर

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेतून खालीपडून मृत झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. दिनेश विनोद शिर्के (३१, विरार मुंबई) असे मृत तरूणाचे नाव आहे.

दि. ३० मे रोजी सकाळी धामणी येथे रूळावरील ट्रॅकमन मिलींद चव्हाण हे रेल्वेरुळाची पाहणी करत असताना धामणी येथील बोगद्याजवळ एका तरूणाचा मृतदेह दिसून याला. रेल्वे प्रशासन, संगमेश्वर पोलीसांना याबाबतची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून पाहणी करत पंचनामा केला. मात्र मृत तरूणाजवळ क ोणतीच कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती.

याचदिवशी दिनेश शिर्के याच्या घरातील मंडळींनी दिनेश बेपत्ता असल्याची फिर्याद विरार पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार त्याचा शोध सुरू होता. दिनेश याचे वर्णन व मृतदेहाचे वर्णन हे मिळते जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. यावेळी हा मृतदेह दिनेशचा असल्याचे त्याच्या घरच्या व नातेवाईकांनी सांगितले. ओळख पटल्यानंतर दिनेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास संतोष झापडेकर करीत आहेत.

Web Title: Young Virar, who passed away from the train, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.