शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

रत्नागिरी जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन; प्रशासनाने दिले हेल्पलाइन क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:53 IST

रत्नागिरी : हवामान खात्याने जिल्ह्यात १५ ते १८ मे या कालावधीत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ...

रत्नागिरी : हवामान खात्याने जिल्ह्यात १५ ते १८ मे या कालावधीत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 वर संपर्क करा.

हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

..अशी घ्या काळजी

  • वीज चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
  • दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
  • वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  • विजेच्या खांबांपासून लांब राहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
  • वीज चमकत असताना मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
  • धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
  • वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.
  • पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  • अशाप्रसंगी मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.

आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क कराजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ०२३५२- २२६२४८/ २२२२३३.जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२.पोलिस टोल फ्री हेल्पलाइन ११२.जिल्हा शासकीय रुग्णालय ०२३५२-२२२३६३.महावितरण नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१८

जिल्ह्यातील तहसील कार्यालयेरत्नागिरी ०२३५२- २२३१२७,लांजा ०२३५१- २३००२४,राजापूर ०२३५३- २२२०२७संगमेश्वर ०२३५४- २६००२४चिपळूण ०२३५५- २५२०४४/९६७३२५२०४४खेड ०२३५६- २६३०३१दापोली ०२३५८- २८२०३६गुहागर ०२३५९- २४०२३७मंडणगड ०२३५०- २२५३३६

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसweatherहवामान अंदाज