रत्नागिरीत कच्चे सिमेंटचे साहित्य खाली टाकताना चुकून डोक्यावर पडले, कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:29 IST2025-12-18T16:29:30+5:302025-12-18T16:29:57+5:30
रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात नाेंद

संग्रहित छाया
रत्नागिरी : इमारतीवरून कच्चे सिमेंटचे साहित्य खाली टाकताना चुकून डाेक्यावर पडल्याने कामगाराचा साेमवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राम महादेव अधिकारी (वय ५८, मूळ रा. राणाघाट, नदियों, पश्चिम बंगाल, सध्या रा. रत्नागिरी) असे कामगाराचे नाव आहे.
राम अधिकारी हा रत्नागिरी येथे बालाजी इंजिनिअरिंग वर्कस् या कंपनीचे सेंट्रिंगचे काम करत होता. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी तो या ठिकाणी काम करत असताना दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास इमारतीवरून कच्चे सिमेंटचे साहित्य खाली जमिनीवर टाकताना चुकून ते रामच्या डोक्यावर पडले. त्यात ताे जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.
काेल्हापूर येथे उपचार केल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी साेडण्यात आले हाेते. दरम्यान, सोमवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या खाेलीतील इतर सहकारी काम संपवून परतले असता त्यांना राम बेशुद्धावस्थेत दिसला. त्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.