शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:57 IST

महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला

राजापूर : लिफ्ट मागणाऱ्या महिलेकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचा दागिना लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ते राजापूर यादरम्यान घडली. लूट करणाऱ्या कारचालकाने त्या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या महिलेने धाडस दाखवून गाडीचा दरवाजा उघडून उडी मारुन आपला जीव वाचवला. पळून गेलेल्या कारचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, रा. कोदवली-तरळवाडी, राजापूर) असे या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोदवली येथे राहणाऱ्या रश्मी चव्हाण गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला येण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांनी मुंबईकडून सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या एका कारला हात दाखवला. कारचालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरवता तो त्यांना पुढे घेऊन जाऊ लागला. आपल्यासोबत काहीतरी अघटित घडतेय याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार केला.कारचालकाने त्यांच्याकडील रोख पाच हजार रुपये, २५ हजार रुपये किमतीची सोन्याची बुगडी आणि तीन हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. अन्य दागिने काढण्याचा प्रयत्न तो करत असताना कारचालकाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर रश्मी चव्हाण यांनी दरवाजा उघडून गाडीतून उडी मारली. चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला.गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीला पाठवण्यात आले. राजापूर पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे.ती गाडी वॅगन-आरमहामार्गावरील पेट्रोल पंप तसेच अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. ही वॅगन-आर कार असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. महामार्गावर दिवसा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman assaulted, robbed after accepting lift on Mumbai-Goa highway.

Web Summary : A woman was robbed and assaulted after accepting a lift near Rajapur on the Mumbai-Goa highway. The driver stole cash, jewelry, and a phone, hitting her with a rod. She escaped by jumping from the car and is hospitalized. Police are investigating.