Ratnagiri Crime: पार्टीदरम्यान होणाऱ्या पतीसोबत महिलेचा बनवला अश्लिल व्हिडिओ; दोन अल्पवयीनसह चौघांवर गुन्हा 

By अरुण आडिवरेकर | Updated: March 10, 2023 16:38 IST2023-03-10T16:38:28+5:302023-03-10T16:38:54+5:30

यामध्ये एका महिलेचाही समावेश

Woman makes obscene video with husband during party in Ratnagiri ; Crime against four including two minors | Ratnagiri Crime: पार्टीदरम्यान होणाऱ्या पतीसोबत महिलेचा बनवला अश्लिल व्हिडिओ; दोन अल्पवयीनसह चौघांवर गुन्हा 

संग्रहीत छाया

रत्नागिरी : एका पार्टीदरम्यान महिलेचा हाेणाऱ्या पतीसाेबत अश्लिल व्हिडीओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार नाचणे (ता. रत्नागिरी) येथे घडला. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन अल्पवयीनसह चाैघांवर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर एकाला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला तक्रारदार महिला तिच्या होणाऱ्या पतीसह गेली होती. याठिकाणी संशयित आरोपी पुरूष तसेच त्याची मैत्रिण व अन्य दोन अल्पवयीन मुल उपस्थित होते. पार्टी सुरू असतानाच महिला व तिचा होणारा पती एका खोलीत असताना त्यांचा अश्लिल व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा संशय या महिलेला आला. आपला व्हिडिओ संबंधितांकडून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला, असा संशय पीडित महिलेला आला. त्यानंतर या महिलेने चौघा संशयितांविरूद्ध शहर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी एक पुरूष व त्याची मैत्रिण, तसेच दोन अल्पवयीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील संशयित पुरूषाला पाेलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली आहे. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Woman makes obscene video with husband during party in Ratnagiri ; Crime against four including two minors