शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

नियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:58 PM

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देनियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देशकायद्याचे पालन करणाऱ्यांना सहकार्य करा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच लोकांना प्रवेश असेल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेदवाराच्या वाहनासह इतर २ अशा केवळ तीनच वाहनांना प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले.

निवडणुकीच्या काळात सर्वांनीच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कायद्याचे पालन करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.यावर्षीची निवडणूक ही अ‍ॅपची निवडणूक असून, दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांपर्यंत नेणे व परत सोडण्याची व्यवस्था प्रशासन करणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजिल हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवरून आतापर्यंत ७ तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

  1.  आतापर्यंत १९५४ शस्त्र जमा करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ३ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. अजूनही ११ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव आहेत. त्यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत १०७ कलमानुसार ३४९, कलम १०९ अन्वये २७ आणि कलम ११० अन्वये ३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 
  2. निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी मैदान, रॅली, सभा, वाहने तसेच पोस्टर, बॅनर, बिल्ले यासंदर्भातील परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. हे कार्यालय जुने तहसील कार्यालय येथे सुरू करण्यात आले असून, याठिकाणी नगरपरिषद, तहसील, परिवहन कार्यालय, गटविकास अधिकारी व पोलीस विभागाचे कर्मचारी असतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 
  3. लोकसभा निवडणुकीसाठी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र ह्यसखी मतदान केंद्रह्ण म्हणून ओळखली जाणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग