शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणाऱ्या तारांबाबत आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

दापोली : गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नादुरुस्त झालेल्या व अद्याप लोंबकळत असणाऱ्या विजेच्या तारांबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे ...

दापोली : गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नादुरुस्त झालेल्या व अद्याप लोंबकळत असणाऱ्या विजेच्या तारांबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना दिला आहे.

याबाबत ते म्हणाले की, गेल्यावर्षी कोकणाला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार फटका दिला. जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांना बसला आहे. दापोली तालुक्‍यात त्यावेळी अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने तालुक्याचा वीजपुरवठा अनेक दिवस बंद होता. त्यानंतर तुटलेले विजेचे खांब बदलण्यात आले. मात्र, काही विजेचे खांब चांगले होते ते तसेच ठेवण्यात आले, पण त्यावरील तारा कट करण्यात आल्या आणि या विजेच्या खांबांवर नवीन तारा बसवण्यात आल्या. त्यावेळी तुटलेल्या व कट करण्यात आलेल्या तारा अद्यापही लोंबकळत आहेत. तालुक्‍याला आणखी एका चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशीच जर आणखी नैसर्गिक आपत्ती आली तर या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा तत्काळ काढून टाकण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मकरंद म्हादलेकर यांनी दिला आहे.