शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

देव तारी त्याला कोण मारी, ७० वर्षीय आजोबांना बुडताना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 6:09 PM

Drowning Case : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावातून कोंडिवरे येथे जाण्यासाठी मोठा पूल आहे. सतत गेले सहा दिवस पडणाऱ्यामुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत

ठळक मुद्देदोन तरुणांनी पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहात झोकून देत त्या आजोबांना किनाऱ्यावर सुखरुप आणले. राजा आत्माराम घाग असे त्यांचे नाव आहे.

मनिष दळवीअसुर्डे  (ता. चिपळूण) : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे आला. सत्तर वर्षाचे एक आजोबा पुलावरून पडले आणि नदीच्या वाढलेल्या पाण्यातून वाहून जाऊ लागले. वाहता वाहता सुदैवाने एक झाड लागले आणि बराचवेळ ते एका झाडाला धरून राहिले. एका दुचाकीस्वाराच्या हे लक्षात आले आणि त्याने ग्रामस्थांना बोलावून आणले. दोन तरुणांनी पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहात झोकून देत त्या आजोबांना किनाऱ्यावर सुखरुप आणले. राजा आत्माराम घाग असे त्यांचे नाव आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावातून कोंडिवरे येथे जाण्यासाठी मोठा पूल आहे. सतत गेले सहा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अश्यातच शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजा आत्माराम घाग हे (वय ७०) हे कोंडिवरे पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरला व ते  थेट पाण्यात पडले.

पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ते पोहणारे असूनही पाण्यासोबत वाहू लागले. पाण्याची तीव्र गती असल्यामुळे ते हतबल झाले. शेवटी त्यांनी एका मोठ्या झाडाचा आधार घेतला व बराच वेळ त्यांनी झाडाला घट्ट पकडून राहिले. याच वेळी तिथून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना वाहत जाताना पाहिले. त्याने तत्काळ कळंबुशी गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र झगडे यांना फोन केला व बघितलेला प्रकार सांगितला.

देवेंद्र यांनी हातातील काम टाकून नदीकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत दर्शन झगडे, दत्ताराम झगडे, रवींद्र झगडे, गणपत चव्हाण, सचिन चव्हाण, ऋतिक झगडे, रितेश घाग यांनीही धाव घेतली. परंतु घाग यांना पाण्याबाहेर आणण्यासाठी यासाठी तरबेज पोहणाऱ्याची गरज होती. अशा वेळी माखजन कुंभार वाडीतील अमित गोपाळ  कुंभार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदी पात्रात उडी घेतली.  अमित कुंभार व देवेंद्र झगडे दोरी घेऊन राजा घाग यांच्या पर्यंत पोहोचले व त्यांच्या कंबरेला दोरी बांधून नदी किनारी आणले.  यासाठी माखजन पोलीस स्टेशनचे पोलीस शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस