Ratnagiri: गुगलचा जवळचा रस्ता टेम्पोचालकाच्या आला जिवाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:01 IST2025-07-29T18:00:43+5:302025-07-29T18:01:53+5:30

फुणगुसनजीक वळणावर आयशर टेम्पो उलटला

While searching for the nearest road through Google Maps and going through Fungus, an Eicher tempo loaded with chemicals overturned and caused an accident | Ratnagiri: गुगलचा जवळचा रस्ता टेम्पोचालकाच्या आला जिवाशी

Ratnagiri: गुगलचा जवळचा रस्ता टेम्पोचालकाच्या आला जिवाशी

देवरुख : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे जवळचा रस्ता शोधून फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो उलटून अपघात झाला. गाडीचा अपघात होतोय हे लक्षात आल्यानंतर चालकाने वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. मात्र, आयशरमधील केमिकलने भरलेली पिंपे घनदाट जंगलात गडगडत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

रंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या केमिकलची ४७ पिंपे घेऊन आयशर टेम्पो (जेजी ३७ बी २२६०) चालक सोमवारी महामार्गावरून गोव्याकडून मुंबईकडे जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने फुणगुस आणि उक्षी मार्ग दाखवला. मात्र, उक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्याने जाकादेवी-फुणगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला.

फुणगुस येथे सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला. यामध्ये असलेले ४७ बॅरलपैकी ३० बॅरल शिल्लक राहिले आहेत. बाकीचे बॅरल उतारावरून जंगलात गडगडत गेले आहेत. टेम्पोचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटलांनी संगमेश्वर पोलिस स्थानकाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Web Title: While searching for the nearest road through Google Maps and going through Fungus, an Eicher tempo loaded with chemicals overturned and caused an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.