शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जलशुध्दिकरण केंद्र कधी होणार ?

By admin | Updated: January 15, 2015 23:31 IST

पाजपंढरी ग्रामस्थांचा टाहो : पावसाळ्यात होणारी पायपीट थांबवावी

आंजर्ले : पावसाला सुरूवात झाल्यावर पाणीटंचाई दूर होते. मात्र, पाजपंढरी गावात पाणीटंचाई सुरू होते. बांधतिवरे नळपाणी योजनेत जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून ही योजना पावसाळ्यात बंद ठेवली जाते. यंदा तरी हे जलशुध्दिकरण केंद्र मंजूर करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.हर्णै - पाजपंढरी गावासाठी १९९६ साली बांधतिवरे नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. १९९६ला मंजूर झालेली ही योजना अनेकविध कारणानी रखडत राहिली. ही योजना २००८ साली पूर्ण झाली. या कालावधीत हर्णै-पाजपंढरीवासीयांना मार्च ते मे महिन्यात पाणी विकत घ्यावे लागत होते. ५० रूपये बॅरल या दराने या तीन महिन्यात लाखो रूपयांची पाणी विक्री व्हायची. २००८ साली बांधतिवरे नळपाणी योजना पूर्ण होऊन कार्यान्वीत झाल्यानंतर हर्णै व पाजपंढरीवासी आनंदी झाले. मात्र, त्यांचा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण नळपाणी योजना मंजूर करताना या योजनेत जलशुध्दिकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मुळात शुध्द पाणीपुरवठा होणे, हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बहुसंख्य आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. मात्र, ही योजना मंजूर करताना जलशुध्दिकरण केंद्राचा त्यात समावेश न केल्याने नागरिकांच्या आरोग्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही हेच सिध्द केले आहे. आता जलशुध्दिकरण केंद्राअभावी पावसाळ्यात ही योजना बंद ठेवावी लागते. कारण ही योजना ज्या नदीवर आहे, त्या नदीला दापोली शहरातून वाहणारी जोग नदी मिळते. दापोली शहरातील कचरा, सांडपाणी या जोग नदीतच टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात या नदीचे पाणी दूषित होते. टीसीएल पावडर टाकून १०० टक्के पाणी शुध्द करता येत नाही. पर्यायाने ही योजना बंद ठेवावी लागते. मासिक २०० रूपये पाणीपट्टी भरूनही भर पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद केला जातो.हर्णै व अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. मात्र, पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळणाऱ्या कोकणात पाजपंढरीवासीयांना विकतचे पाणी प्यावे लागते, तर काहींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे उलटे चित्र राज्यातील एकमेव उदाहरण असावे. या स्थितीची दखल घेऊन शासनाने तातडीने बांधतिवरे नळपाणी योजनेसाठी जलशुध्दीकरण केेंद्र मंजूर करावे व पावसाळ्यात पाण्यासाठी होणारी पाजपंढरीवासीयांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)भर पावसातही सुरू राहते दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे तीव्र पाणी टंचाई.पाजपंढरी येथे भरपावसात निर्माण होणाऱ्या टंचाईवर कायमचा उपाय करण्याची मागणी.जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने प्रदूषित पाण्याचा प्रश्न कायम ऐरणीवर.हर्णै - अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने पाणीटंचाई नाही.