रत्नागिरीच्या आकाशात दिसणारा 'रहस्यमय' प्रकाश कोणता?; नागरिकांमध्ये चर्चा, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:49 IST2026-02-26T13:22:48+5:302026-02-26T13:49:17+5:30

बुधवारी सायंकाळी बऱ्याच लोकांनी सूर्यास्तानंतर आकाशाच्या दिशेने पाहिले असता त्यांना चकचकीत रेषा पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाताना दिसली.

What is the 'mysterious' light seen in the sky of Ratnagiri?; Discussion among citizens, video goes viral | रत्नागिरीच्या आकाशात दिसणारा 'रहस्यमय' प्रकाश कोणता?; नागरिकांमध्ये चर्चा, Video व्हायरल

रत्नागिरीच्या आकाशात दिसणारा 'रहस्यमय' प्रकाश कोणता?; नागरिकांमध्ये चर्चा, Video व्हायरल

रत्नागिरी - जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या सुमारास आकाशात एकामागोमाग एक २० ते २५ प्रकाशमान वस्तू पुढे सरकताना आढळून आल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. नेमके हे काय आहे याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नारायण मळी परिसरासह सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा भागातील लोकांना या प्रकाशमान वस्तू पश्चिमेकडून दक्षिणकडे सरकताना दिसल्याचे सांगण्यात येते. काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आकाशात चमकणाऱ्या या वस्तू पाहून ‘धूमकेतू आहे का?’, ‘एलियन शिप तर नाही ना?’ अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र खगोल अभ्यासक बाबासाहेब सुतार यांनी यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले. 

काल सायंकाळी बऱ्याच लोकांनी सूर्यास्तानंतर आकाशाच्या दिशेने पाहिले असता त्यांना चकचकीत रेषा पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाताना दिसली. ही एक सॅटेलाइटची शृंखला म्हणजेच कृत्रिम उपग्रहांची माळ होती. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने जगभर ब्रॉड बँड सेवा पुरवण्यासाठी स्टार लिंक उपग्रह सोडले आहेत. सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी हे उपग्रह विशिष्ट रेषेत दिसून येतात. काल आकाश स्वच्छ असल्याने अनेकांना हे दृश्य दिसले असं बाबासाहेब सुतार यांनी सांगितले.

दरम्यान हा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान अविष्कार म्हणता येईल. स्टार लिंक कंपनीने कृत्रिम उपग्रह आकाशात सोडल्याने त्यातीलच एक मालिका रत्नागिरीकरांना दिसली आणि लोकांमध्ये कुतुहल जागरूक झाले. पण ही घटना नियमित घडणारी असून तिचे वेळापत्रकही उपलब्ध असते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारख्या अवकाशातील वस्तू देखील पाहता येतात. त्यामुळे लोकांमध्ये वैज्ञानिक जागरुकता आणि कुतुहल निर्माण होते एवढीच ही घटना आहे असं सुतार यांनी स्पष्ट केले. 

Web Title : रत्नागिरी के आकाश में रहस्यमय रोशनी; नागरिकों में चर्चा, वीडियो वायरल।

Web Summary : रत्नागिरी में रात के आकाश में रोशनी की एक श्रृंखला देखी गई, जिससे जिज्ञासा बढ़ गई। रोशनी को एलन मस्क की ब्रॉडबैंड इंटरनेट परियोजना, स्टारलिंक उपग्रहों के रूप में पहचाना गया। यह घटना नियमित है, जो सूर्योदय और सूर्यास्त के दौरान दिखाई देती है।

Web Title : Mystery lights spotted in Ratnagiri sky; citizens discuss viral video.

Web Summary : Ratnagiri residents spotted a string of lights in the night sky, sparking curiosity. The lights were identified as Starlink satellites, part of Elon Musk's broadband internet project. This phenomenon is a regular occurrence, visible during sunrise and sunset.