रत्नागिरी : कोणत्याही कामाबाबत ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले आहे, अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.आपली राजकीय कारकीर्द सुरू होताना पहिली १५ ते २० वर्षे अजितदादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी राजकारणापलिकडचे संबंध होते आणि आम्ही दोघांनीही ते जपले होते. आमच्यातील राजकीय आणि विकासकामांसोबतच खेळीमेळीच्या चर्चाही सातत्याने होत असत, असे मंत्री सामंत म्हणाले.पुणे एमआयडीसीबाबतच्या एका विषयावरुन मंगळवारी दिवसभरात आमची तीनवेळा फोनवरुन चर्चा झाली. सायंकाळी ७ वाजता आमचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी अशी धक्कादायक बातमी कानावर येईल, असे वाटले नव्हते, असे त्यांनी सांगितले.कोणतेही काम समोर आल्यानंतर करतो, बघतो असे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. ऑन द स्पॉट काम करणारे नेतृत्त्व हीच त्यांची ओळख होती आणि म्हणूनच अशा नेत्याने निरोप घेणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप मोठे नुकसानकारक आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.
Web Summary : Minister Uday Samant expressed grief over Ajit Dada's demise, recalling his decisive leadership and their close working relationship. Samant highlighted Pawar's prompt decision-making and the significant loss for Maharashtra's politics. Their last conversation was Tuesday regarding Pune MIDC.
Web Summary : मंत्री उदय सामंत ने अजित दादा के निधन पर शोक व्यक्त किया, उनके निर्णायक नेतृत्व और घनिष्ठ कामकाजी संबंधों को याद किया। सामंत ने पवार के त्वरित निर्णय लेने की क्षमता और महाराष्ट्र की राजनीति के लिए हुई महत्वपूर्ण क्षति पर प्रकाश डाला। पुणे एमआईडीसी के बारे में मंगलवार को उनकी अंतिम बातचीत हुई थी।