शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

वारकऱ्यांच्या बसला चुकला..अन् जीवाला मुकला!; चिपळूणातील रविंद्र मोरे याचा अपघातात मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: July 17, 2024 17:22 IST

रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही

चिपळूण : पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरूणाच्या बाबतीत घडली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे या तरूणावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातात आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पुर्ण न करताच विठूरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणात्सव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला.गेल्या दहा वर्षापासून रविंद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत. याहीवर्षी त्याने पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती. पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खासगी बस केली होती. त्यामुळे या लोकांनी रविंद्रला विचारले होते. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीचीवारी मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे २०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला. मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली. तेथून ५ किलोमिटर अंतरावर दिघंजी येथे पोहोचताच वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुधीर हा गाडीजवळच कोसळला. तर रविंद्र मोरे हा रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर १५ मिनीटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या. त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही. निवाते याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता. अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रविंद्र मोरे याची प्राणज्योत मालवली होती. याचवेळी आधी पंढरीला गेलेल्या गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्याना धक्काच बसला. यानंतर पंढरपूरात असलेले गावकरी माघारी फिरले आणि घटनास्थळी आले. त्याचवेळी पेढे  ग्रामस्थ देखील तेथे पोहोचले. रात्री उशिरा रविंद्र मोरे याचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पेढे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाते याला अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे. रविंद्र मोरे याच्या या अचानक जाण्याने तालुक्यातील वारकऱ्यासह ग्रामस्थांमधून शोक व्यक्त होत आहे.

मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगररविंद्र मोरे हा उत्तम सुवर्ण कारागिर होता. सोने चांदीचे नक्षीदार दागिणे घडविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याने २० हून अधिक तरूणांना या व्यवसायात आणून त्यांना कारागिर बनवले. आज ते विविध सुवर्णपेढ्यांमध्ये कौशल्य दाखवत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू