राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:11 PM2021-10-03T16:11:40+5:302021-10-03T16:13:23+5:30

राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील कोल्हापूर-सिंधुदुर्गला जोडणाऱ्या नव्या आजिवडे  घाट रस्त्याची पाहाणी केली. यावेळी त्यांना स्वत:च्या पक्षाचे सर्वोच्च नेते तथा राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचाच विसर पडल्याचे दिसून आले.

Vinayak Raut called Ashok Chavan the Chief Minister instead of Uddhav Thackeray | राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

Next

सावंतवाडी - खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील कोल्हापूर-सिंधुदुर्गला जोडणाऱ्या नव्या आजिवडे  घाट रस्त्याची पाहाणी केली. यावेळी त्यांना स्वत:च्या पक्षाचे सर्वोच्च नेते तथा राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचाच विसर पडल्याचे दिसून आले. यावेळी राऊत यांनी चक्क बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. पण आपण चुकीचे नाव घेतले, यांची त्यांना शेवटपर्यंत पुसटशीही कल्पना आली नसल्याने आर्शचय व्यक्त केले जात आहे. (Vinayak Raut called Ashok Chavan the Chief Minister instead of Uddhav Thackeray)
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेतील अतर्गत वाद विकोपाला गेला आहे. कालच माजी मंत्री रामदास कदम यांची मंत्री अनिल परब यांच्या संदर्भातील व्हिडिओ किल्प बाहेर आली आहे. यातच आता राऊतांच्या तोंडातून मुख्यमंत्र्याचे नाव बदलल्याने ते चर्चेत आहेत.
 

 

Web Title: Vinayak Raut called Ashok Chavan the Chief Minister instead of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app