गुहागरात गावठी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:07 IST2021-03-02T19:05:43+5:302021-03-02T19:07:21+5:30
liquor ban Excise Department राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू विरोधातील मोहीम अधित तीव्र केली असून, कौंढर काळसूर (ता. गुहागर) येथील गावठी दारू निर्मिती केंद्रावर मंगळवारी धाड टाकून केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्ह्यातील ही आतपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुहागरात गावठी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू विरोधातील मोहीम अधित तीव्र केली असून, कौंढर काळसूर (ता. गुहागर) येथील गावठी दारू निर्मिती केंद्रावर मंगळवारी धाड टाकून केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्ह्यातील ही आतपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अनेक हातभट्ट्यांवर छापे मारून गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कौंढर काळसूर येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
या माहितीनुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक, चिपळूण, खेउ, लांजा, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली.
यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास २३००० लीटर रसायन आढळले. या कारवाई दरम्याने कोणतीही व्यक्ती आढळलेली नाही. त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.