शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:22 IST

सर्वच पक्षांना हवी आहे चिपळूणची उमेदवारी

रत्नागिरी : तळकोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव विजय मिळवून देणारी चिपळूणच्या जागेवर यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अशी लढत होण्याची शक्यता आहे. पक्षाचे दोन भाग झाल्याने दोन्ही गटांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीतील हे घटकपक्ष काय भूमिका घेणार, यावर चिपळूणचा निकाल ठरणार आहे.बरीच वर्षे चिपळूण मतदारसंघावर शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व होते. मात्र युतीचे वर्चस्व मोडून काढत २०१९ साली राष्ट्रवादीचे शेखर निकम येथे आमदार झाले. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केल्यामुळे आता त्यांना शिंदेसेना आणि भाजपची साथ आहे.

आधी काँग्रेसमध्ये असलेले प्रशांत यादव आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. तेथे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अन्य उमेदवार असले तरी लढत या पक्षात असेल.

शिंदेसेनेसह भाजपही चिपळूणसाठी आग्रहीया मतदार संघातील विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने महायुतीकडून पुढील उमेदवार तेच असतील, हे निश्चित आहे. मात्र तरीही महायुतीतील शिंदेसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष येथे निवडणूक लढवण्याच उत्सुक आहेत. प्रत्यक्षात उमेदवारी कोणाला मिळणार आणि त्यांचे मित्रपक्ष काय करणार, यावर निकाल ठरू शकतो.

काँग्रेसलाही हवी चिपळूणची उमेदवारीमहाविकास आघाडीत उद्धवसेनेसह काँग्रेसनेही या जागेची मागणी केली आहे. तालुका काँग्रेसच्या बैठकीत या जागेसाठी अधिक आग्रह धरण्यात आला होता. तशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे जागा वाटपानंतरची काँग्रेसची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरणार आहे.

उद्धवसेनेत इच्छुक अधिकगतवेळी शेखर निकम विजयी झाले तेव्हा शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यातही ते महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे उद्धवसेनेला ही जागा लढवण्याची तीव्र इच्छा आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने. राजेंद्र महाडिक येथील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही आधी येथे लढण्याची तयारी केली हाेती. या सर्वांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShekhar Nikamशेखर निकम