शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:56 IST

शिंदेसेनेत मात्र अजून उमेदवारीबाबत संभ्रम

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला उमेदवारी मिळणार, या एकमेव चर्चेने गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. जागा वाटप, उमेदवारी यातील काहीही निश्चित झाले नसले तरी येथे शिंदेसेना आणि उद्धवसेना या दाेघांमध्ये चुरशीची निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे.अनेक वर्षे भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात २००९ साली परिवर्तन झाले आणि तेथे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. दोनवेळा ते राष्ट्रवादीचे म्हणून विजयी झाले आणि २०१९ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आपल्या विजयाची हॅट्ट्रीक केली. आता चौथ्यांदा ते येथे लढतील, असे दिसत आहे. पण २०१९ च्या शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष येथे सक्षम असला, तरी तो भास्कर जाधव यांच्यासोबत राहील का? असा प्रश्न आहे.

दुसरीकडे शिंदेसेनेकडून येथील उमेदवार जाहीर झालेला नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नातेवाईकाला येथे उमेदवारी दिली जाणार, अशी मोठी चर्चा झाली. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

मित्रपक्षांची भूमिका

  • महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही मित्रपक्षाची साथ किती मिळेल? असा प्रश्न आहे. या जागेसाठी भाजप आग्रही होती. पण ही जागा शिंदेसेनेला जाणार असेच दिसत आहे. त्यामुळे भाजप काय करणार, हे महत्त्वाचे आहे.
  • महायुतीप्रमाणेमहाविकास आघाडीतही सारे आलबेल नाही. भास्कर जाधव राष्ट्रवादीतून बाहेर पडले असल्याने तेथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना साथ देतील का? असा प्रश्न आहे. केवळ शिवसेनेच्या मतांवर सामोरे जायचे असेल तर त्यातही फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024thaneठाणे