शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:48 AM

Culture Ratnagiri : सहकार, साहित्य, शिक्षण, कृषि, साहित्य, क्रीडा आदी विषयात नियमित सक्रीय वावर असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, कृषिभूषण, लेखक डॉ. तानाजी चोरगे यांची महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. या निमित्ताने कोकणला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. तानाजी चोरगेकोकणातील साहित्यिक चळवळीला बळ

चिपळूण : सहकार, साहित्य, शिक्षण, कृषि, साहित्य, क्रीडा आदी विषयात नियमित सक्रीय वावर असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, कृषिभूषण, लेखक डॉ. तानाजी चोरगे यांची महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. या निमित्ताने कोकणला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या डॉ. चोरगे यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. हे आत्मचरित्र वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप आपणास अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रांत आणि शेतात रमणाऱ्या डॉ. चोरगे यांच्या साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ गुहागर येथील ज्ञानरश्मि वाचनालयाने आपल्या सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह असे नाव दिले आहे.दोन वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानेही आपले सन्माननीय सदस्यत्व त्यांना प्रदान केले आहे. डॉ. चोरगे यांच्यासह ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर व दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. प्रथमच परिषदेची ही सभा ऑनलाईन घेण्यात आली. डॉ. चोरगे यांच्या उपाध्यक्षपदामुळे कोकणातील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमींना आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यcultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण