शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वनराई योजनाच रूतली गाळात...

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

चिपळूणमध्ये शेतकरी संकटात : पाणी सोडाच बंधारेही झाले नाहीत पूर्ण.

अडरे : चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनसुद्धा ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी पर्याय म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, पिण्यासाठी उपयोग व्हावा. तसेच सिंचन क्षमता वाढावी म्हणून शासनाने वनराई बंधारा ही योजना सुरु केली होती. परंतु, गेली ३ वर्ष योजना बंद पडल्याने ही योजना गाळातच रुतली आहे. २०१२ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत गावागावात कामे देऊन कृषी विभागातर्फे ही योजना राबविण्याचे प्रमुख उद्दिष्ट शासनातर्फे ठरविण्यात आले होते. मागणीनुसार तसेच ग्रामस्थांना पाणी मिळावे, विहिरींच्या पातळीत वाढ व्हावी, भाजीपाला करता यावा, पाणी मुबलक उचलता यावे यांसारखी धोरणे डोळ्यासमोर ठेवून गावागावात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरु झाली. परंतु, या योजनेला मागणी असली तरी कायमस्वरुपी ही योजना उपयुक्त नसल्याचे दिसून आले. त्यातच रिकाम्या सिमेंटच्या बॅगांचा तुटवडा आणि योजनेसाठी आवश्यक ते अनुदान मिळत नसल्याने ही योजना अखेर गाळातच गेली.चिपळूण येथील कृषी विभागातर्फे २०१२ साली १३१ वनराई बंधारे बांधण्यासाठी ४ लाख ६४ हजार ८८० रुपये तर ११ सलग सम पातळीसह चर (डोंगर पातळीवर खड्डे पाडणे) बांधण्यात आले. यासाठी ३५ हजार ४६९ रुपये असे एकूण ५ लाख ३४९ रुपये खर्च करण्यात आले होते. २०१२ नंतर चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात सिमेंटच्या पिशव्यांचा अभाव व अनुदानही बंद झाल्याने ही योजना बंद पडली.त्यानंतर गेली तीन वर्षांत तालुक्यात एकही वनराई बंधारा बांधण्यात आलेला नाही. वनराई बंधाऱ्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करता येत होती. शेती, गुरांना मुबलक पाणी मिळायचे. परंतु, वनराई बंधारा ही योजना बंद झाल्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोकणातदेखील अनेक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असेच चित्र आहे. (वार्ताहर)


कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यात येत होती.