शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-जिल्ह्यात पाच केंद्रांवर ५०० जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:51 IST

Corona vaccine Ratnagiri -कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता जिल्ह्यात शनिवारी करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये आणि दोन ग्रामीण रुग्णालये इथल्या प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा मुले-गावडे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाच केंद्रांवर ५०० जणांना लसीकरणदापोली, कामथे, राजापूर, गुहागर या ठिकाणी लसीचा प्रारंभ

रत्नागिरी : कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता जिल्ह्यात शनिवारी करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये आणि दोन ग्रामीण रुग्णालये इथल्या प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा मुले-गावडे यांनी दिली.जिल्ह्यात लसीकरणासाठी १६ हजार ३३० डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात १४ हजार ९६० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. शनिवारी यापैकी ५०० जणांना ही लस देण्यात आली आहे. कोरोनावरील लसीबाबत सामान्य माणसाला उत्सुकता आहे.

शनिवारी जिल्हा रुग्णालयासह, दापोली, कामथे ही दोन उपजिल्हा रुग्णालये, राजापूर, गुहागर ही दोन ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी या लसीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या केंद्रांकडे प्रत्येकी ११० डोस देण्यात येत असून, साठवणुकीसाठी योग्य ती यंत्रणा या केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. लसीकरणासाठी लसीकरण अधिकाऱ्यांसह पाचजणांची टीम तयार आहे.जिल्हा रुग्णालयात लसीकरण कक्ष उभारण्यात आला असून, काही दिवसांपूर्वीच लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीही झाली आहे. लसीकरणाच्या नियोजनासाठी सुरुवातीलाच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीही स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात सकाळी ८ वाजता लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.निरीक्षणानंतर निर्णयतयार केलेल्या यादीनुसार डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारी अशा १०० जणांना लस देण्यात येत आहे. याची सज्जता जिल्हा रुग्णालयाने केली आहे. लस दिल्यानंतर काही दिवस काही गुंतागुंत होते का, हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना कधी लस देणार, हे ठरवले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले - गावडे यांनी दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल