शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी पर्ससीननेटवरही अन्यायकारक बंदी

By admin | Updated: July 3, 2016 23:40 IST

राकेश भाटकर : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला आदेश

रत्नागिरी : सोमवंशी समितीचा अहवाल बेकायदेशीर असून, शासनाने त्या अहवालानुसार मिनी पर्ससीनवर मासेमारी बंदीचे आदेश काढले. त्यामुळे मिनी पर्ससीन नेटधारकांवर अन्याय होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने राज्य सरकारला तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० मिनी पर्ससीन नेटधारक मच्छीमार उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सोमवंशी समिती तज्ज्ञांची समिती असली तरी समितीने दिलेला अहवाल बेकायदेशीर आहे. मत्स्य व्यवसाय कायद्याप्रमाणे शासनाने सल्लागार समिती नेमणे आवश्यक होते. त्यामध्ये जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि मच्छीमारांचे प्रतिनिधी असतात. कायद्यानुसार या नियुक्त केलेल्या समितीकडून अहवाल मागवून त्यावर बंदीची कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, ही समिती शासनाने नियुक्त केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे १५० मिनी पर्ससीन नेट नौका आहेत. या नौकांवर सुमारे १५०० पेक्षा जास्त खलाशी काम करीत आहेत. तसेच या व्यवसायावर मिनी पर्ससीन नेटधारकांसह अन्य कुटुंबिय अवलंबून आहेत. या प्रत्येक नौका बांधणीसाठी सुमारे २० ते २२ लाख रुपये खर्च येतो. घर, दागिने गहाण ठेवून तसेच कर्ज काढून या व्यवसायात उतरले आहेत. या व्यावसायिकांनी मासेमारीसाठी परवान्याची मागणी मत्स्य खात्याकडे करुनही त्यांना ती दिलेली नाही. मात्र, शासनाने अचानक घातलेल्या बंदीमुळे पर्ससीननेटधारक कर्जात बुडाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी अध्यादेश पारित करुन पर्ससीन मासेमारीचे नवीन परवाने न देण्याबाबत व मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्याबाबत अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला रत्नागिरीतील ५२ मिनी पर्ससीन नौका मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सोमवंशी समितीने शासनास सादर केलेला अहवाल बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. सोमवंशी समितीने शासनास अहवाल देताना कायद्यातील तरतुदीनुसार मिनी पर्ससीन नेटधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता शासनास अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातील शिफारशीनुसारच शासनाने बंदीचा अध्यादेश काढल्याने मिनी पर्ससीननेटधारकांवर अन्याय झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने ते ग्राह्य मानले आहे. (शहर वार्ताहर) मिनी पर्ससीन नेटधारक मच्छीमार ५ फॅदमच्या पुढे मासेमारी करण्यास तयार आहेत. तसेच जीपीआरएस उपकरणही लावण्यासही मागे पडणार नाहीत, असे अ‍ॅड. भाटकर यांनी सांगितले.