Anil Parad: विनायक राऊतांपाठोपाठ अनिल परब यांच्या बंगल्यावरही काचेच्या बाटल्या फेकल्या; पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:32 IST2021-08-25T16:32:18+5:302021-08-25T16:32:50+5:30
Anil Parad: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर झालेली सुटका यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

Anil Parad: विनायक राऊतांपाठोपाठ अनिल परब यांच्या बंगल्यावरही काचेच्या बाटल्या फेकल्या; पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू
Anil Parad: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर झालेली सुटका यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील बंगल्यावर अज्ञातांनी काचेच्या बाटल्या फेकल्याचं प्रकरण ताजं असतानाच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याही बंगल्यावर अशाप्रकारचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यांचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील बंद असलेल्या निवासस्थानी अज्ञाताने सोडा बॉटल फेकत हल्ला चढवला आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ते तपास करत आहे. मात्र अद्याप पर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.