Two ST Accidents At Karambale Mall; 7 injured with driver | करंबेळे मैल येथे दोन एसटीचा अपघात; चालकासह ७ जखमी
करंबेळे मैल येथे दोन एसटीचा अपघात; चालकासह ७ जखमी

ठळक मुद्देकरंबेळे मैल येथे दोन एसटीचा अपघात; चालकासह ७ जखमीदिड तास दुतर्फा वाहतूक कोंडी

देवरुख : संगमेश्वर-देवरुख राज्य मार्गावर करंबेळे मैल आर्दशनगर थांबा येथे दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बाजू देताना झालेल्या अपघातात चालकासह ६ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातामुळे सुमारे दिड तास दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

देवरुखक पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ५वाजता देवरुख हून सुटणारी देवरुख- नेरदवाडी ही गाडी संगमेश्वरच्या दिशेने जात होती तर मुंबई- देवरुख ही गाडी देवरुखकडे येत होती. करंबेळे मैल आदर्शनगर येथे या गाड्या आल्या असता अपघात झाला.

पाऊसामुळे रस्ता निसरडा झाला होता तर साईडपट्टीवरील माती रस्त्यावर आलेली होती. या अपघातात देवरुख- नेरदवाडी गाडीचा चालक व ६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी देवरुख पोलिस हजर झाले असून पंचनामा उशिरापर्यंत करण्यात आला.

शिल्पा मिरगल (३४, मुचरी), राजश्री रेवाळे (५०, कोसुंब), स्मिता चव्हाण (५२ शिवणे), सुरज खानविलकर (१९, साखळकोंड ), पराग देवळेकर (१९, असुर्डे), मानसी उबारे (कोसुंब) व नेरदवाडी बसचालक प्रदीप जाधव हे जखमी झाले आहेत. मुंबई गाडीवरील चालक प्रदिप राजाराम जाधव घेउन देवरुख कडे येत होते.


Web Title: Two ST Accidents At Karambale Mall; 7 injured with driver
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.