शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:21 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला.चालक मोहम्मद अत्तार समशेर अली शहा (२२, रा. नागनाथपूर, पकरपूर, सुलतानपूर, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर गुलाम मोहम्मद रज्जाक अली शहा (२१, रा. इब्रदीमपूर, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी चालक मोहम्मद अली शहा हा ट्रक (एमएच. ०४, एचडी. ८२९२) मधून लोखंडी सळ्या भरून गोवा ते मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ट्रक बावनदी पुलाच्या अलीकडील उतारातील वळणात आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक उलटला.हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघाताची माहिती तेथील पोलिस पाटील संजना पवार (४१, रा. निवळी, कोकजे वठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू