crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू
By अरुण आडिवरेकर | Updated: January 18, 2023 16:08 IST2023-01-18T16:06:39+5:302023-01-18T16:08:06+5:30
काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू
विनोद पवार
राजापूर : तालुक्यातील भालावली येथे दाेन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज, बुधवारी (दि.१८) दुपारच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात एका मुलींचा मृत्यू झाला असून, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरून गेला आहे.
भालावली येथील या दाेन मुली तेथूनच जवळ असणाऱ्या महाविद्यालयातून घरी जात हाेत्या. त्याचवेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखाेराने तीक्ष्ण हत्याराने दाेघींवर हल्ला करून जखमी झाले. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दाेघींना धारतळे येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात तातडीने दाखल केले. यावेळी रुग्णलयाबाहेर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली हाेती.
दरम्यान, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या एका मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती नाटे पाेलिसांना मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.