संगमेश्वरात दोन कारचा अपघात, गाड्यांचे मोठे नुकसान; वाहतुकीची कोंडी 

By मनोज मुळ्ये | Updated: April 20, 2023 16:11 IST2023-04-20T16:10:34+5:302023-04-20T16:11:00+5:30

अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी

Two car accident in Sangameshwar, heavy damage to cars; traffic jam | संगमेश्वरात दोन कारचा अपघात, गाड्यांचे मोठे नुकसान; वाहतुकीची कोंडी 

संगमेश्वरात दोन कारचा अपघात, गाड्यांचे मोठे नुकसान; वाहतुकीची कोंडी 

सचिन मोहिते

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी पुलावर दोन कारचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. तर मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी गाड्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला. 

सोनवी पूल अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काही दिवसापूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला. मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्रीच्या दिशेने जाणारी कार आणि रत्नागिरीहून डेरवणलाच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस किशोर जोयशी, शेलार, भाऊ मोहिते यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. 

Web Title: Two car accident in Sangameshwar, heavy damage to cars; traffic jam