शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 3:29 PM

ratnagiri Ram Mandir fund- रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी २.५३ कोटींवर रुपयांचा निधी दिला. हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू. गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.

ठळक मुद्देजगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटीसुरुवातीपासूनच मंदिर उभारणीबाबत भूमिका

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज धाम येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी २.५३ कोटींवर रुपयांचा निधी दिला. हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू. गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.यावेळी देवगिरी महाराज म्हणाले की, मी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे सामाजिक कार्य पाहून तृप्त झालो आहे. ते खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम करीत आहेत. संस्थानने दिलेला हा निधीरूपी प्रसाद सत्कारणी लागेल. जगदगुरू महाराजांचे हिंदूधर्म पुनर्प्रवेशाचे कार्य मोठे आहे, असे दूर दृष्टीचे महाराज या भूमीला लाभले आहेत, त्यांचे काम दिव्य आहे, असे सांगितले.जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यावेळी म्हणाले की, श्रीराम मंदिर उभारणीच्या निमित्ताने जातीपाती बाजूला ठेवून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन राष्ट्र उभारणीचे काम करूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद साधूसंतांना सतत प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. यातून हिंदू धर्म विश्वधर्म होईल, असा विश्वास व्यक्त केला.सुरुवातीला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोविंद देवगिरी महाराजांचा जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्‍व हिंदू परिषदेचे गोवा - महाराष्ट्रचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, श्रीपाद जोशी, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर यांनी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज व संस्थानच्या सेवाकार्याचा गौरव केला. विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री विनायक देशपांडे यांच्या हस्ते प्रवीण सावंत (पाली), प्रमोद खटखूळ (नाणीज), मनोज सुर्वे (पाली) या स्थानिक कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीपाद जोशी, अनिरूद्ध पंडित, मोहन भावे, विवस्वान हेबाळकर, जयंत देसाई, मुन्ना उर्फ रवींद्र सुर्वे, आनंद मराठे, उमा देवळे, उदय चितळे, सतीश घोटगे उपस्थित होते. प. पू. कानिफनाथ महाराज यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत यांनी केले.सुरुवातीपासूनच मंदिर उभारणीबाबत भूमिकाअयोध्येत श्रीराम मंदिर झालेच पाहिजे, अशी भूमिका जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी सुरुवातीपासून घेतली होती. गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, उतराखंड आदी राज्यात होणाऱ्या दौऱ्यांमध्ये हिंदुत्व जागरण व श्री राम मंदिराची उभारणी याबाबत त्यांची जनजागृती सुरू होती. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRatnagiriरत्नागिरीfundsनिधी